विश्लेषण

जयकुमार गोरे हे तर गावगुंड : विश्वजितराजे  

सरकारनामा ब्युरो

फलटण (सातारा) : "माणचे आमदार जयकुमार गोरे हे प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली, की त्यांना प्रसिद्धी मिळते. रामराजेंवर टीका करण्याची जयकुमार गोरे यांची पात्रता नसून, ते माण तालुक्‍यातील गावगुंड आहेत'', असा आरोप फलटण पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदर गोरे यांना लगावला. 

विश्वजितराजे म्हणाले, "आमदार गोरे यांनी माण तालुक्‍यात किती व कोणकोणते तीर मारले आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात आहे. त्यांच्या मतदारसंघात कसलाही विकास झाला नाही. याउलट रामराजेंच्या नेतृत्वाखाली फलटण मतदारसंघात भरघोस विकास झाला असून, पूर्वी शिरवळवरून फलटणला येताना ओसाड राने दिसत होती. आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या दिसत असून त्या सुरू आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फलटण तालुक्‍याबद्दल कोणीही कितीही टीका केली, तरी हे सर्वांना ज्ञात आहे. फलटण व खंडाळा हे तालुके रामराजेंमुळेच ओलिताखाली आले आहेत. अनेक विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. गोरे यांच्यात हिंमत असेल तर फलटण व माण तालुक्‍यांच्या विकासाची तुलना त्यांनी करावी. या मतदारसंघाची तुलना होऊ शकत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. रामराजेंनी केलेली विकासकामे सांगायची झाली, तर पुढील काही दिवसांचे अंक पुरणार नाहीत. त्यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांमध्ये माण मतदारसंघात कसलाही विकास केला नाही. त्यांनी नेमके काय केले, हे तरी जनतेला सांगावे. निवडणूक जवळ आल्याने पाण्याचा मुद्दा उपस्थित करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न गोरे करत आहेत. या वेळी माण तालुक्‍यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT