विश्लेषण

गणपती प्रसन्न होतो, याची मला खात्री; बाप्पा पाहिजे त्याला अपत्यही देतो: नांगरे-पाटील 

सरकारनामा ब्युरो

सातारा : गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे. सिध्दीविनायक मंदीरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेले आहेत. इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. 

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते. 

नांगरे पाटील म्हणाले, डीजेवर आवाज कमी ठेवा. मंजूळ गिते लावा. भावगिते, भक्तीगिते लावा. त्यातून गणपती प्रसन्न होतो. गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे. मी गणपतीच्या पुस्तकातून शिकून आलोय. मी एवढा अंधश्रध्दाळू आहे. सिध्दीविनायक मंदीरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेले आहेत. इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. ज्या गणपती बाप्पाच्या नावाने प्रत्येक कार्याची सुरवात होते. जो विद्यार्थ्यांला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो. अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो. मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो पण पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही. टेन्शन दूर करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे.

आमच्याही घरी पाच दिवस गणपती होते. पण बऱ्याचवेळा मला आरतीलाही उपस्थित राहता येत नव्हते. ही परिस्थिती पोलिसांनी असते. पोलिसांना 12, 14, 18 तास उभे राहावे लागते. त्यातून अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. त्यांना कायद्याची दंडुक्‍याची भाषाही दाखवावी लागते. तरी पण का नागरीक शास्त्र शिकवावे लागते, असा प्रश्‍न करून नांगरे-पाटील म्हणाले, नियम उपनियम, न्यायालयाचे निर्देश हे आपल्या भल्यासाठी आहेत. नियमाचे बंधन घालून संवादातून आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT