West Bengal Assembly Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी (ता.23) पार पडला. 152 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. तब्बल 92.88 टक्के मतदान झाले. गेल्या वर्षीचे तुलनेत तब्बल 10 टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान म्हणजे सत्तेविरोधी लाट आहे की असलेली सत्ता आणखी मजबूत करण्यासाठी दिलेला कौल याची चर्चा सुरू झाली आहे.
2021 मध्ये या 152 जागांपैकी 92 जागा या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला तर, 59 जागा भाजपला मिळाल्या होत्या. वाढलेल्या मतदानामुळे भाजपकडून आम्ही पहिल्या टप्प्यात 100 चा आकडा पार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, राजकीय विश्लेषणकांच्या मते ममता बॅनर्जींना फार फटका बसताना दिसत नाही. त्यांच्या मते टीएमसीच्या 10 ते 12 जागा कमी होतील आणि भाजपच्या तितक्याच वाढतील. त्यामुळे भाजपची सत्ते येत आहे हे म्हणणे घाईचे ठरेल.
महिला मतदारांच्या मतदानामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पुरुषांच्या मतदानाच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान हे तीन टक्क्यांनी वाढलेले आहे. आणि हेच मतदान ममता बॅनर्जींना तारणार आहे. कारण महिला मतदार या त्यांच्या हक्काच्या मतदार राहिलेल्या आहेत. त्यामुळेच टीसीएमसी नेत्यांकडून देखील पहिल्या टप्प्यात आपण पुढे असल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 152 जागांवर मतदान झाले. त्यामध्ये मुर्शीदाबाद या मुस्लिम बहुल जिल्ह्याचा समावेश आहे. येथे 93 टक्के मतदान झाले येथे 22 विधानसभेच्या जागा आहेत. मुस्लिम लोकसंख्या 65 टक्क्याहून या भागात आहे. या भागात टीसीएमसीचे वर्चस्व राहिले आहे. येथे भाजपला फारशी संधी दिसून येत नाही. तर, कूचबिहार जिल्ह्यात 94 टक्के मतदान झाले आहे. येथे भाजपचा चांगला पाठींबा आहे. त्यामुळे भाजप-टीसीएमसीमध्ये काटे की टक्कर दिसून येते.
भाजपला 2021 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 77 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे त्यातील 59 जागा या आत्ता होत असलेल्या पहिल्या निवडणुकीच्या टप्प्यातील जागांवर मिळाल्या होत्या. त्यामुळे या भागामध्ये भाजपचा आलेख वाढता राहिला आहे. 2011 मध्ये या भागात भाजपने एकही जागेवर विजय मिळवला नव्हता. मात्र. 2016 मध्ये हा आकडा तीन पर्यंत पोहोचला. आणि 2021 मध्ये 59 जागांवर विजय मिळवत सर्वांना आश्चर्य चकीत केले. त्यामुळे भाजपचा या भागातील वाढता प्रभाव पाहाता त्यांच्या जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने राबवलेल्या एसआयआर प्रक्रियेमुळे तब्बल 10 टक्के मतदारांची नावे कापली गेली आहे. यात मुस्लिम मतदारांची नावे सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. मुस्लिम मतदारांसोबत हिंदू मतदारांची नावे देखील कापली गेली आहेत. त्यामुळे एसआयआर विरोधात मोठ्या प्रमानात नाराजी आहे.त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. आणि एसआयआरसाठी भाजपला जबाबदार धरत त्यांच्या विरोधात मतदान झाल्याचे दिसून येत असल्याचे विश्लेषण काही राजकीय विश्लेषक करत आहेत. मात्र, त्याला काही ठोस आधार नसल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे निकालानंतरच एसआयआरचा फटका नेमका कोणाला हे स्पष्ट होऊ शकेल.
भाजपने ही निवडणूक 2021 च्या तुलनेत आक्रमकपणे लढवली नसल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी ग्राऊंडवर योग्य नियोजन करत टीएमसीला मात देण्याच्या रणनीतीवर भर दिला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा न देता त्यांनी ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढली आहे. मात्र, ती 'M' टीसीएमसीला तारतील, अशी शक्यता आहे. ते तीन एम म्हणजे ममता बॅनर्जी, मुस्लिम आणि महिला.
ममता बॅनर्जी यांचे आक्रमक नेतृत्व पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. पक्षाबाबत त्यातील नेत्यांबाबत वेगवेगळी मते असू शकतात मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर बहुसंख्य मतदारांचा विश्वासू दिसून येतो. भाजपमुळे मुस्लिम मतदार हा टीएमसीकडे वळला आहे. तर, महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांमुळे महिला मतदार या भाजपपेक्षा टीएमसीला मतदान करताना दिसून येतात.
गेल्या निवडणूकीत 84 टक्के मतदान झाले आणि यंदा 92.88 टक्के मतदान झाले. जवळपास 9 टक्के मतदान वाढल्याचा दावा केला जात आहे. मात्र, एसआरआयमुळे दहा टक्के मतदारांची नावे कापली गेली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच 84 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. मात्र, दहा टक्के मतदार कमी झाल्याने मतदानाची आकडेवार ही 90 पार झाल्याचे दिसत आहे, असा दावा काही विश्लेषकांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.