Raj_Thakray_Chandrakant_patil.
Raj_Thakray_Chandrakant_patil. 
विश्लेषण

'कोहिनूर'साठी पैसा आला कुठून? :चंद्रकात पाटील

सरकारनामा

नागपूर :  सक्तवसुली संचालनालय (ईडी) एका दिवसात कारवाई करीत नाही. त्याकरिता अनेक वर्षे रेकी केली जाते. उत्पन्नाचे स्रोत तपासले जातात. त्यामुळे सरकारच्या आदेशावरून ईडी कारवाई करते, असे म्हणणे हास्यास्पद आहे.

जे 20 वर्षांपूर्वी स्कुटरने फिरत होते ते कोट्यधीश कसे झाले? कोट्यवधीची कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी पैसे आले कुठून, असा प्रश्‍न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथील पत्रकारांशी चर्चेदरम्यान उपस्थित केला.

छगन भुजबळ, अजित पवार यांचे विषय आता न्यायालयात आहेत. या प्रकरणांत न्यायालयाने जी माहीती मागविली, तेवढी माहीत सरकार पुरविते. आमचा विषय तेथेच संपतो. त्यामुळे सरकार आकसापोटी कारवाई करीत आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही श्री पाटील म्हणाले. 

महाजनादेश यात्रा ही आभार यात्रा आहे. यामध्ये सरकारने पाच वर्षांत जे काम केले, ते जनतेसमोर मांडणे. त्यांच्याकडून फीडबॅक घेणे, नवीन सुचना आमंत्रित करणे ही प्रक्रिया सुरु आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले, त्यांच्याप्रती आम्ही उत्तरदायी आहोत.

केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर आमचे सर्व आमदारही दरवर्षी मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधतात, फीडबॅक घेतात आणि त्यांच्याकडून काही सुचना असल्यास त्यावर काम करतात, असेही चंद्रकात पाटील एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT