complaints against nana Patole : Sunil Kedar : Vijay Wadettiwar
complaints against nana Patole : Sunil Kedar : Vijay Wadettiwar Sarkarnama
विश्लेषण

Nana Patole News : पटोलेंच्या विरोधातील तक्रारींची काँग्रेसश्रेष्ठी दखल घेणार?

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole News : कॉंग्रेसचा कर्नाटकमधील (Karnataka) यशाचा विजय अजून पुरेसा साजरा होत नाही तोवरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भांडण सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विजय वड्डेवट्टीवार, सुनील केदार (Sunil Kedar) आणि शिवाजीराव मोघे या विदर्भातील तीन दिग्गज नेत्यांनी आघाडी उघडली आहे.पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटत पटोले यांना बदलण्याची थेट मागणी त्यांनी केली आहे. कॉंग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपमदेखील त्यांच्यासोबत होते.

विदर्भातील हे तीन प्रमुख नेते आणि पटोले यांच्यातील ही लढाई आता थेट दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठींपर्यंत पोचली आहे. यावर काँग्रेसश्रेष्ठी कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे कॉंग्रेसजणांचे लक्ष लागले आहे.पटोले आणि या तीन नेत्यांना सबुरीचा सल्ला देतात की कारवाई करतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार शक्यता आहे. या तिघांसोबत पटोले यांचा संघर्ष आधीपासूनच आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात या संघर्षाने जोर धरला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला प्रचंड विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस अधिक जोरकसपणे तयारी करीत असल्याचं चित्र निर्माण केलं आहे. मुळातच पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आक्रमकपणे काम करीत आहेत. योगायोगाने पुण्यातील कसबा मतदारसंघातील प्रचंड विजय काँग्रेसच्या आणि पर्यायाने पटोले यांच्या कामी आला आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक मधला काँग्रेसचा विजय संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसलाच एक नवा उत्साह आणि उभारी देणार आहे.

कर्नाटकच्या निकालानंतर आधीचा आक्रमक असलेले नाना पटोले अधिकच आक्रमक झाले आहेत.पक्षातील नेत्यांना बरोबर न घेता ते पुढे जात असल्याचा प्रामुख्याने पटोले यांच्यावर होत आहे. त्यामुळे विदर्भातील या दिग्गज नेत्यांबरोबर असलेला वाद कॉंग्रेसला परवडणारा नाही. याचा परिणाम पक्षाच्या संघटनेवर होऊ शकतो याची जाणीव पक्षातील वरिष्ठांना आहे. त्यामुळे ते यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी आशा पक्षातील जुणे-जाणते कार्यकर्ते बाळगून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT