Pooja Khedkar Sarkarnama
विश्लेषण

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना UPSC मध्ये कुणी मदत केली? दिल्ली पोलिसांचा शोध अन्..!

Rajanand More

New Delhi : वादग्रस्त पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दिल्लीतील न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. हा निकाल देताना कोर्टाने दिल्ली पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहे. खेडकर यांना UPSC मध्ये कुणी मदत केली, या शोध घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती मोठे मासे लागणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली आहे. त्याआधी त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही.

पूजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी फसवणूक केल्याचा ठपका यूपीएससीने ठेवला आहे. नावात बनवाबनवी केल्याचे यूपीएससीच्या तपासात उघड झाले आहे. यंत्रणेतील त्रुटीचा गैरफायदा त्यांनी घेतला.

यामध्ये त्यांना यूपीएससीतून कुणी मदत केली का, नाव, पत्ता, मोबाईल आदी माहिती बदलल्यानंतर कागदपत्रे तपासणीत याबाबत काहीच संशय कसा आला नाही, त्यांचे दिव्यांगत्वाची तपासणी आणि त्याअनुषंगाने प्रमाणपत्राची पडताळणी का झाली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आणखी प्रकरणांचा शोध घेण्यासही कोर्टाने पोलिसांना सांगितले आहे. सोशल मीडियात काही अधिकाऱ्यांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढत चालले आहे. एवढी प्रकरणे असतील तर ‘यूपीएससी’मध्ये होणारी कागदपत्रांची पडताळणी, आरोग्य तपासणी, रुग्णालयांकडून दिली जाणारी प्रमाणपत्र, संबंधित डॉक्टर, अधिकाऱ्यांकडून होणारी मदत, हे सगळेच संशय निर्माण करणारे आहे.

दिल्ली पोलिसांकडून खेडकर प्रकरणाचा तपास अधिक सखोल केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागू शकतात. कोर्टाने तसे आदेशही दिले आहेत. पोलिसांनी खेडकर यांना अटक केल्यानंतर काही महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात. दिल्ली पोलिस महाराष्ट्र येऊनही तपास करतील. त्यातून हा तपास कुणाला गजाआड घेऊन जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT