Sanjay Shinde Karmala
Sanjay Shinde Karmala 
विश्लेषण

संजयमामा शिंदे निवडणूक लढवणार का? महिनाभरापासून कार्यकर्त्यांमध्ये शांतता

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर लगेचच करमाळा तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढवलीच पाहीजे म्हणून आग्रह धरला. मात्र, गेल्या महिनाभरापासुन करमाळ्यातील संजय शिंदे यांचे कार्यकर्ते शांत आहेत. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातुन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे हे निवड लढणार की नाही? याबाबत साशंका निर्माण झाली आहे. 

लोकसभेसाठी भाजपकडुन ऑफर असतानाही संजय शिंदे हे राष्ट्रवादी कडुन लढले आणि पराभूत झाले. संजय शिंदे लोकसभा निवडणुक लढवत असल्याचा सर्वाधिक आनंद बागल गटाला झाला. विधानसभेला शिंदेची मदत होईल अशी त्यांची अपेक्षा होती.लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता संजय मामा विधानसभा निवडणुक लढवणार असा निशाना साधत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यानंतर बागलांनी पक्ष प्रवेशाची घाई केल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले आहे. 

आता राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना मिळणार अशी ही चर्चा रंगली. मात्र, सद्यस्थितीत शिंदे काय करणार आहेत. यांचा कोणालाच अंदाज येईना असा झाला आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे भाजप प्रवेशाचे ठरले असल्याचेही बोलले जात आहे. संजय शिंदे यांना भाजप प्रवेश दिला जाणार का? या विषयी ही उत्सुकता लागली आहे.

वास्तविक पहाता संजय शिंदे हे राष्ट्रवादी कडुन इच्छुक नसल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे ते युतीच्या निर्णयाची वाट पहात आहेत. त्यामुळे सध्या संजयमामाची भुमीका वेट अन्ड वाॅच अशीच आहे. परिणामी करमाळा तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते ही शांतच आहेत. या बाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारले असता मामांचा लवकरच निर्णय होणार आहे असे ते सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT