Halwankar-Danve 
विश्लेषण

दानवे होणार केंद्रात मंत्री; हाळवणकरांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी ?  

विद्यमान प्रदेशाध्यक्ष श्री.दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यांच्या जागी अनेक दिग्गजांची नावे स्पर्धेत असली तरी श्री.हाळवणकर यांचेही नाव प्रदेश पातळीवर चर्चेत असल्याचे समजते.

पंडित कोंडेकर

इचलकरंजी  : येथील आमदार सुरेश हाळवणकर यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्री मंडळात समावेश होण्याची संकेत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी श्री.हाळवणकर यांचे नाव चर्चेत असून सध्या ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत.

भाजपने आता पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याची स्ट्रॅटेजी आखलेली असल्याने प्रदेश अध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या नावाचा विचार सूरु असल्याचे समजते . 
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे पहिले विधान सभेतील आमदार म्हणून श्री.हाळवणकर यांची ओळख आहे. सलग दुसऱ्यांदा ते इचलकरंजी विधान सभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांच्यावर पक्षाने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी यापूर्वीच दिली आहे. या पदावर काम करतांना पक्षाची मजबूत बांधणी करण्यात त्यांना यश आले आहे.

मुळात त्यांची राजकीय वाटचाल ही भाजपमधूनच झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. मंत्रीमंडळात काम करण्याची संधी असतांनाही आमदार हाळवणकर यांनी पक्ष कार्याला प्राधान्य दिले आहे. महत्वाच्या निवडणूकांमध्ये त्यांच्यावर पक्षांने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आले आहे.
   
विद्यमान प्रदेशाध्यक्ष श्री.दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यांच्या जागी अनेक दिग्गजांची नावे स्पर्धेत असली तरी श्री.हाळवणकर यांचेही नाव प्रदेश पातळीवर चर्चेत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT