yediyurappa refused offer of union minister by atal bihari vajpayee
yediyurappa refused offer of union minister by atal bihari vajpayee 
विश्लेषण

त्यावेळी वाजपेयींना थेट नकार कळवून येडियुरप्पा राज्यातच थांबले!

वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपची सर्वप्रथम सत्ता स्थापन होत पक्षाचा मुख्यमंत्रीही बनला होता. याच येडियुरप्पांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी बोलावूनही केंद्रात जाण्यास थेट नकार दिला होता.  

येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी हे त्यावेळी पंतप्रधान होते. त्यांनी मला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु, मी त्यांना नकार कळवला होता. मी कायम कर्नाटकात राहीन, असे मी त्यांनी कळवले होते. राज्यात भाजप वाढवणे ही माझ्यासाठी कायम अग्निपरीक्षा होती. 

येडियुरप्पांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आपले मोठे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांनी मला देशाच्या सेवेसाठी झोकून देण्याची प्रेरणा दिली. याचबरोबर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मोठे पाळबळ आणि प्रेम मिळाले.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे ते राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. आज सायंकाळी नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT