मुंबई : अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका युवासेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले यांनी अमृता यांच्या ट्वीटला उत्तर देताना त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ठाकरे आडनाव लावले म्हणून कुणी ठाकरे होत नाही असे म्हटले होते.
शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून " मराठी बिग बॉसचे ऑडिशन कुठे सुरू आहे का? असे विचारले आहे. तसेच माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल सारख्या गाण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार नसल्याचे म्हटले आहे. या अगोदर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी देखील ट्विट केलं होते. " सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली ', अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!' एवढेच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी ' " # आजच्या आनंदीबाई ' असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
वरुण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला उत्तर देताना बिग बॉससारख्या रिऍलिटी शोचा उल्लेख केला आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश मिळविताना सुद्धा चर्चेत राहण्यासारखी विधाने करावी लागत असतात. तसेच त्या शोमध्ये टिकून राहण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काही ना काही विधान करावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे अमृता फडणवीसांचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस यांना बरेच ठिकाणाहून गाण्याच्या कार्यक्रमांचे निमंत्रण यायचे तसेच त्यांनी त्या काळात अनेक अल्बममध्ये आणि सिनेमांमध्ये गाणे गायले आहे. याचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.