व्यक्ती विशेष

धनंजय मुंडेंना छातीशी धरुन आईने आनंदाश्रूंना वाट करून दिली 

दत्ता देशमुख

बीड : धनंजय मुंडे यांनी मागच्या वेळीच्या २५ हजार मतांच्या पराभवाच्या आकड्याचे अंतर कापत आता ३० हजारांवर मतांनी विजय मिळविला. विजयाचा तर कुटूंबियांना सहाजिकच अत्यानंद झाला.

पण, याच वेळी विरोधकांकडून नेहमी व्हिलन अशी त्यांची प्रतिमा रंगविण्याचा होत असलेल्या प्रकाराचे दु:खही त्यांच्या मनी असावे. पण, या प्रतिमेलाही तडा देऊन धनंजय मुंडेंनी परळीकरांच्या मनात आपली प्रतिमा कोरल्याच्या आनंदात आई रुक्मिनबाई मुंडेंनी आपल्या आश्रुंना वाट मोकळी करुन दिली.


धनंजय मुंडे यांनी तब्बल ३० हजारांवर मतांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. मागच्या वेळी २५ हजार मतांनी झालेल्या पराभवाचे अंतर कापून त्यांनी ३० हजार मताधिक्क्याचेही अंतर कापले. मात्र, या विजयापेक्षा त्यांनी सर्वच बाबतीत प्रतिकुल परिस्थितीत केलेली वाटचाल महत्वाची ठरली. समोर सत्तेच्या सर्व शिड्या आणि धनंजय मुंडे तुटक्या पायऱ्यांवरुन चालत होते. आई रुक्मिनबाई व पत्नी राजश्री यांना याचा अभिमान वाटतच राहणार. 


 मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरुन व्हायरल झालेला कथित व्हिडीओमुळे विरोधकांनी त्यांना खूप  ट्रोल केले त्याच्या   वेदना त्यांच्या आई व पत्नीला झाल्या असतील. पण, गुरुवारच्या निकालानंतर विजयाचा आनंद  धनंजय मुंडे यांच्या घरी पहायला मिळाला. दुपारपर्यंतच विजयाच्या समिप पोचल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांनी गुलाल उधळायला सुरुवात केली होती. 


नंतर, विजयी आघाडी मिळाल्यानंतर त्यांची शहरातून जंगी मिरवणुकही निघाली. मिरवणुक आटोपून धनंजय मुंडे घरी पोचल्यानंतर त्यांच्या आई, पत्नी व त्यांच्या बहिणी असे कुटूंबिय आरती घेऊन त्यांच्या औक्षणाला आले. पण, औक्षण केल्यानंतर आई रुक्मिनबाई मुंडे धनंजय मुंडेंना छातीवर डोके ठेवून आपल्या आश्रुंना वाट मोकळी करुन दिली. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्याही ओलावल्या . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT