व्यक्ती विशेष

`कमाईचा प्रवाह आटला; पण शेतकऱ्यांच्या मदतीचा बांध फुटला`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ``काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला. माझ्या दैनंदिन जीवनावर त्याचा तसा फारसा परिणाम झाला नाही. निकालानंतर मी ८-१० दिवसांच्या महाराष्ट्राच्या दुष्काळ दौ-यावर गेलो होतो. पण या दरम्यान माझी गाडी कोणत्याही पेट्रोल पंपावर थांबलेली मला आठवत नाही. वीजबिलही माला दिसल नाही. महिन्याचा पगार सहकाऱ्यांनी मागितला नाही.....`` अशा साऱ्या घटना माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडल्या आहेत.

पराभवाने प्रवाह थांबला पण जनतेच्या मदतीचा बांध फुटला, अशा शब्दांत सहकारी मदत करत असल्याच्या प्रक्रियेचं वर्णन केलं आहे. याबाबत सोशल मिडियावर त्यांनी आपल्या भावन व्यक्त केल्या आहेत.

``खासदारकी गेल्यानंतर माझं आता इतकं वजन नसल्यानं गाडीचं अॅव्हरेज वाढलं असावं, म्हणुन मी खूष होतो. गेल्या महिन्याचं घरचं लाईटबील कुठं ही माझ्या नजरेत आलं नव्हतं. गेल्या महिन्याचा पगार माझ्या सहका-यांनी मागितला नाही. आॅफिसमधला खर्चाचा तगादा लागला नाही.  या खर्चाची सर्व काळजी शेतकरी घेत आहेत,``असं राजू शेट्टींनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.  

आंबा येथील चिंतन शिबिरादरम्यान एकेक शेतकरी येऊन काही रक्कम माझ्या हातावर ठेवत होता. माझ्या पराभवानं खचलेल्या शेतक-याचं मनोधैर्य वाढावं म्हणून चिंतन शिबीर होतं. पण जमलेल्या शेतक-यांनी त्यांच्या वागण्यानं मलाच चिंतन करायला भाग पाडलं. शिबीरात कार्यकर्त्यांनी तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये माझ्या हातात दिले. हे पैसे माझ्या दोन्ही हातांमध्ये मावत नव्हते,``असा अनुभव त्यांनी सांगितला.

आता मला खासदारकीचा भत्ता नाही किंवा वेतन नाही म्हणुन चळवळ थांबता कामा नये, यासाठी या शेतक-यांनी ही शक्कल लढवल्याचं कळालं. माझी ८५,००० रुपये ची पेन्शन आहे त्यातली घरखर्चाची किरकोळ रक्कम वगळता राहिलेली रक्कम चळवळीसाठीच खर्च करायचं मी ठरवलं होतं, पण  शेतक-यांनी आता माझा घरखर्च सुद्धा उचलला आहे, आणि एवढ्यावर न थांबता, इमर्जन्सीला पैसे असावेत या भावनेने माझ्या खिशात त्यांच्या खिशातील हाताला लागेल ती नोट सरकवत आहेत. माझ्याकडे असलेला आर्थिक कमाईचा प्रवाह जरी आटला असला तरी माझ्यासाठी शेतक-यांचा आर्थिक मदतीचा बांध फुटला.,``असे त्यांनी मनोगतात म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT