poet kumar vishwas offers condolence to urdu poet rahat indori family
poet kumar vishwas offers condolence to urdu poet rahat indori family  
व्यक्ती विशेष

कुमार विश्वास म्हणतात, एक बेहद ज़िंदादिल हमसफ़र हाथ छुड़ा कर चला गया...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचे आज निधन झाले. इंदोरी यांच्यासोबत मुशायऱ्यांमध्ये कवी कुमार विश्वास नेहमी सहभागी असायचे. त्यांनी मित्राच्या जाण्याबद्दल  भावना व्यक्त केल्या आहेत. बेहद दुखद ! इतनी बेबाक़ ज़िंदगी और ऐसा तरंगित शब्द-सागर इतनी ख़ामोशी से विदा होगा,कभी नहीं सोचा था, असे विश्वास यांनी म्हटले आहे. 

राहत इंदोरी हे 70 वर्षांचे होते. इंदोरी यांची कोरोना चाचणी रविवारी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सर अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना हृदय विकाराचे दोन झटके आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 

इंदोरी यांनी कोरोना झाल्याची माहिती आज सकाळी स्वत:च ट्विटरवर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, कोविडचे प्राथमिक लक्षण दिसून आल्याने माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी अरबिंदो रुग्णालयात दाखल झालो आहे. मी या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावे, यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा. कृपया माझ्या घरच्या व्यक्तींना कॉल करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस करु नये. फेसबुक आणि ट्विटरवरुन माझ्या प्रकृतीबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल. 

कुमार यांनी मित्र गेल्यानंतर आता ट्विटरवर भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे ईश्वर ! बेहद दुखद ! इतनी बेबाक़ ज़िंदगी और ऐसा तरंगित शब्द-सागर इतनी ख़ामोशी से विदा होगा,कभी नहीं सोचा था. शायरी के मेरे सफ़र और काव्य-जीवन के ठहाकेदार क़िस्सों का एक बेहद ज़िंदादिल हमसफ़र हाथ छुड़ा कर चला गया.

याचबरोबर त्यांनी राहत इंदोरी यांच्या रचनाही त्यांनी उद्धृत केल्या आहेत. 
1) हमारे मुँह से जो निकले वही सदाक़त है 
हमारे मुँह में तुम्हारी ज़ुबान थोड़ी है ?
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे 
किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है...?

2) मैं मर जाऊँ तो मेरी इक अलग पहचान लिख देना,
लहू से मेरी पेशानी पे हिन्दुस्तान लिख देना..!

3) अजीब लोग हैं,मेरी तलाश में मुझको, 
वहाँ पे ढूँढ रहे हैं, जहाँ नहीं हूँ मैं...!
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT