Raj Thakre - Devendra Phadanavis
Raj Thakre - Devendra Phadanavis 
व्यक्ती विशेष

जिम सुरु करण्याबाबत राज ठाकरे - देवेंद्र फडणवीसांचे झाले एकमत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारने सामाजिक अंतर राखण्या संदर्भात जे नियम घालू दिले आहेत त्याचं पालन करून तुम्ही जिम सुरू करा. स्वतःची आणि लोकांची काळजी घ्या. इम्युनिटी वाढवा. मी इथल्या परवानगी संदर्भात आणि या विषयी विरोधी पक्ष नेत्यांशी बोललोय, ते हा मुद्दा मांडतील, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम मालकांना दिले आहे. 

कोरोनाचा लाॅकडाऊन झाल्यापासून जिम, व्यायामशाळा बंद आहेत. अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, राज्यातल्या जिम अद्याप सुरु न झाल्याने जिम चालक अत्यंत अडचणीत आले आहेत. घेतलेले कर्ज, जागांचे भाडे असा सगळाच भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे जिम सुरु करुन दिलासा द्यावा या अपेक्षेने आज जिम असोसिएशन, बाॅडी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी हे आश्वासन दिले. मी या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून नियम पाळून जिम सुरु करायला हरकत नाही, असे त्यांचेही मत असल्याचे राज यांनी यावेळी सांगितले. 

शरीर सौष्ठवपटू मनिष आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज राज यांची भेट घेतली. जिम सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी व या करता मनसे अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, यासाठी राज यांना निवेदन देण्यात आले. अनलाॅकच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने जिम सुरु करायला काही अटींवर परवानगी दिली आहे. ५ आॅगस्टपासून जिम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने अद्याप जिम सुरु करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज्यभरातले जिमचालक नाराज आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT