व्यक्ती विशेष

पुण्यातील स्वच्छतादूत देशपांडे यांच्या कामाची नगरविकास मंत्र्यांकडून दखल 

प्रशांत घाडगे

पुणे : फर्ग्युसन रस्ता आणि डेक्कन परिसरात पदपथ आणि रस्त्यांची साफ-सफाई गेल्या वीस वर्षापासूनच करणाऱ्या जगन्नाथ देशपांडे या स्वच्छतादूताच्या बातमीची दखल नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली आहे. पुण्यातील या स्वच्छतादूताला भेटण्याची इच्छा पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

जगन्नाथ देशपांडे यांच्या कामाचे माहिती देणारे वृत्त `सकाळ`मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाटील यांनी त्याचे कौतुक केले. तसेच पुण्यात आल्यानंतर देशपांडे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. 


 
देशपांडे हे तरुण असताना आई-वडिलांचे निधन झाल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली. या त्रासातून ते घर सोडून भटकंती करु लागले. भटकंती करत असताना ते डेक्कन परिसरात स्थिर झाले. लहानपणापासून कष्ट करत असल्याने त्यांनी साफ-सफाई सुरु केली. त्यांची कष्ट करण्याची वृत्ती बघून परिसरातील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक त्यांना दोन वेळचे जेवण देत आहेत.

सध्या देशपांडे वयाच्या 68 व्या वर्षातही साफ-सफाई करुन स्वच्छतादूताची भूमिका बजावत आहेत. ते अत्यंत निःस्वार्थीपणे काम करत असून पदपथ, रस्त्यांची साफ-सफाई केल्यानंतर साचलेला कचरा गुडलक चौकाशेजारी एकत्रित करतात. यानंतर, महापालिकेच्या गाडीतून तो कचरा नेला जातो. स्वच्छतेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देशपांडे मूळचे भोर तालुक्‍यातील हरवण या गावचे रहिवासी आहेत.गेल्या वीस वर्षापासून ते डेक्कन परिसरात राहून स्वच्छतेचे काम करीत आहेत. डेक्कन पोस्टाजवळील भाजी मंडईत देशपांडे यांचा मुक्काम असतो. या परिसरातील दुकानदारांच्या घरातील एक सदस्य म्हणूनच वावरत आहेत. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT