महापालिका नगरसेवकांना  फेसबुकवर  नालायक  म्हणणारे   अधिकारी खरवडकर  निलंबित

AMC-Kharwadkar
AMC-Kharwadkar

औरंगाबाद :  "नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर ते तत्त्वज्ञानी बनून बेछुट आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात' ' असा मजकूर असलेली पोस्ट फेसबुकवर टाकणारे महापालिकेतील शाखा अभियंता जयंत खरवडकर यांना अखेर बुधवारी (ता. 21) निलबिंत करण्यात आले आहे.

12 फेब्रुवारी रोजी खरवडकर यांनी ही पोस्ट टाकली होती. यावर काही नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत खरवडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी खरवडकर यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानूसार मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी निर्णय घेत खरवडकर यांना आज निलंबित केले.

ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होण्याआधीच्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी खरवडकर यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. त्याचा राग धरत खरवडकर यांनी नगरसेवकांना उद्देशून वरील पोस्ट टाकली होती.

त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली होती. आयुक्त मुगळीकर यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतर खरवडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांचे अधिकार काढून घेतले होते. 15 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा या प्रकरणावरून खडाजंगी झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com