बीडमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीवरून काका-पुतणे भिडले

जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणे अशी ओळख असलेल्या क्षीरसागर घराण्यात नगरपालिका निवडणुकीपासून वादाची ठिणगी पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी आव्हान दिले. पुतण्याच्या या बंडाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडूनच बळ दिले जात असल्याचे देखील बोलले जाते.
बीडमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीवरून काका-पुतणे भिडले

बीड : नगरपालिका निवडणुकीपासून क्षीरसागर घराण्यात सुरु झालेले काका-पुतण्यामधील शीतयुध्द काही केल्या थांबायचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. ग्रामपंचात निवडणुकीवरून जयदत्त व संदीप क्षीरसागर यांच्याती द्वंद्व पुन्हा एकदा पहायला मिळाले. बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचातींवर दोघांनीही दावा करत एकमेकांवर शेलक्‍या भाषेत टीका देखील केली. त्यामुळे आता बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायती नेमक्‍या कुणाच्या ताब्यात असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणे अशी ओळख असलेल्या क्षीरसागर घराण्यात नगरपालिका निवडणुकीपासून वादाची ठिणगी पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी आव्हान दिले. पुतण्याच्या या बंडाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडूनच बळ दिले जात असल्याचे देखील बोलले जाते. दरम्यान, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केल्यामुळे पक्षात आणि जिल्ह्यात देखील त्यांचे वजन वाढले.

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतांना पुन्हा एकदा काका-पुतण्याचे गट आमने-सामने आले आहेत. तालुक्‍यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर त्याचे श्रेय घेत जयदत्त क्षीरसागर यांनी प्रसिध्दी पत्रक काढले. याची कुणकुण लागताच दुसऱ्याच दिवशी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी याच गावातील पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या सत्काराचे फोटो प्रसारमाध्यमांकडे पाठवून या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असल्याचा दावा केला. एवढ्यावरच न थांबता ज्यांना उमेदवार मिळाले नाहीत त्यांनी बिनविरोधाचे नाटक करु नये असा टोला काका जयदत्त क्षीरसागर यांना लगावला.

नाक कापले जाऊ नये म्हणून 'बिनविरोध'चा बनाव केला जात असल्याचा आरोप देखील संदीप क्षीरसागर यांनी काकांवर पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. पुतण्याच्या या आरोपाला काका जयदत्त क्षीरसागर यांनीही लगोलग पदाधिकाऱ्यांना बोलावून सत्कार करत उत्तर दिले. संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीकडून बनवाबनवी, विकासाचे राजकारण करा, बनवाबनवी नको अशा शब्दांत त्यांनी पुतण्याची कानउघडणी करणारे प्रसिध्दी पत्रक काढले.

या ग्रामपंचायतीवर दावा
वाढवणा, पांढरवण, सौंदाणा, वानगाव, दगडीशहाजानपूर, शिरपूरदास, कारंडी, बेलगांव आणि सावरगांव घाट या बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतीवर काका-पुतण्यांनी दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या स्वीय सहायकाने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या मेलमध्ये सावगावघाट ग्रामपंचायत धनंजय मुंडे याच्या ताब्यात असल्याचा दावा केल्याने या नाट्यात अधिकच रंगत आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com