Gajanan Ghuge - Shivaji Mane
Gajanan Ghuge - Shivaji Mane

बंडखोरांनी आणले युतीच्या उमेदवारांना टेंशन....

विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (ता. ४) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत या तीनपैकी दोन मतदारसंघात शिवसेना व भाजप महायुतीच्या विरोधात त्यांच्याच पक्षांतील बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या या बंडखोरीने युतीच्या अधिकृत उमेदवारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

हिंगोल : विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (ता. ४) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत या तीनपैकी दोन मतदारसंघात शिवसेना व भाजप महायुतीच्या विरोधात त्यांच्याच पक्षांतील बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या या बंडखोरीने युतीच्या अधिकृत उमेदवारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला असून तिथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात विद्यमान काँग्रेस आमदार संतोष टारफे यांचे आव्हान आहे. मात्र युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे माजी आमदार गजानन घुगे व माजी खा. शिवाजी माने हेही भाजपकडून उमेदवारीसाठ इच्छुक होते. मात्र ही जागा शिवसेनेला सुटल्यावर या दोघांनी संयुक्त शक्तीप्रदर्शन करत आपापले स्वतंत्र उमेदवारी अर्ज काल अखेरच्या दिवशी दाखल केले. त्यांच्या पैकी एक जण आपली उमेदवार कायम ठेवणार असल्याचे समजते. त्यामुळे बाांगर यांचे आव्हान खडतर होणार आहे.

वसमत या दुसऱ्या मतदारसंघातही पारंपरिक अशी दांडेगावकर, मुंदडा अशी लढत पाहायला मिळेल, असे वाटत होते. मात्र तिथेही शिवसेनेने आपले उमेदवार म्हणून शेवटच्या क्षणी विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी दिली. आधी जागा सुटल्यावरून व नंतर उमेदवारीच्या दिव्यातून शिवसेनेला जावे लागले. या ठिकाणी भाजपचे बलाढ उमेदवार शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंदडांसाठी ही निवडणूक अवघड बनली आहे. राष्ट्रवादीने इथे आपला नेहमीचा पारंपरिक चेहरा डाॅ. जयप्रकाश दांडेगावकर यांना उमेदवारी न देता राजू नवघरे या नवीन चेहऱ्यास संधी दिली आहे. तगड्या बंडखोरांमुळे हिंगोली जिल्ह्यात महायुती अडचणीत आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com