नांदेडच्या गुरुद्वाराचे ६१ कोटीचे कर्ज माफ करण्यात येणार -मुख्यमंत्री फडणवीस

- गुरु गोविंदसिंगजी म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम- गुरुद्वाराच्या जागेवरील आरक्षण रद्द केले जाईल- गुरुद्वाराच्या परिसरात मद्यविक्रीचे दुकाने बंद करण्यात येतील-गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंती दिनानिमित्त म्हणजे ता. २२ डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी
CM-Nanded-Gurudwara
CM-Nanded-Gurudwara

नांदेड   : "श्री. गुरुगोविंद सिंग महाराजांचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंघ म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम  आहे ,"  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. ३१) येथे केले.

नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री. गुरु गोविंद सिंघ यांच्या ३५० व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की," नांदेड येथील गुरुद्वारा येवून गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन उर्जा मिळते. गुरु गोविंद सिंग  यांनी या पंथास बलिदानाचे विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविदसिंग यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने गुरुत्तागद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले ६१ कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल," असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या निवासाकरिताच्या भुखंडावर असलेले आरक्षण रद्द करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंती दिनानिमित्त म्हणजे ता. २२ डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगून गुरुद्वारा परिसरातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पंचप्यारे साहिबांच्या वतीने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंगजी यांनी श्री. फडणवीस यांचा पारंपरिक पध्दतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरुद्वारा बोर्डामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव विशेषांकाचे विमोचन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारा सिंग यांनी केले. तर सरदार सरजीतसिंग  गिल यांनी आभार मानले. 

यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग  , हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, सचखंड गुरुद्वाराचे संतबाबा कुलविंतसिंगजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे संतबाबा बलवंसिंगजी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संतुक हबर्डे,

उपाध्यक्ष भुपिंदर सिंघ मिनहास, सचिव भागिंदर सिंघ घडीसाज, चेअरमन-शिक्षण समिती अमरीकसिंग  वासरीकर, चेअरमन-स्टाफ कमेटी सरजीत सिंघ गिल, चेअरम-ईस्टेट कमेटी राजिंदर सिंग  पुजारी, सदस्य शेरसिंग फौजी, गुरमित सिंग  महाजन, दलजीत सिंग  हैद्राबाद, गुरदीप सिंग  भाटिया, अवतार सिंग  मक्कड,

गुरिन्दरसिंग बाबा, इकबालसिंग  सबलोक, रघुजीत सिंग  विर्क, सुरिन्दरसिंग , परमजोत सिंग  चाहेल, रणजीत सिंग  कामठेकर, उपजिल्हाधिकारी तथा चेअरमन व्यवस्थापन समिती श्रीमती अनुराधा ढालकरी, सदस्य व्यवस्थापन समिती गुलाबसिंग  कंधारवाले, नौनिहाल सिंग  जागीरदार, रविंदर सिंग  बुंगई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com