'सेल्फी विथ खड्डे' च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांची उडी!

राज्यातील खड्ड्यांचे वास्तव चव्हाटयावर आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात 'सेल्फी विथ खड्डे' ही जोरदार मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला आहे. आता या वादात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यामुळे खड्डे सेल्फी विथ ही मोहीम येत्या काळात बरीच रंगणार आहे.
'सेल्फी विथ खड्डे' च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांची उडी!

मुंबई : राज्यातील खड्ड्यांचे वास्तव चव्हाटयावर आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात 'सेल्फी विथ खड्डे' ही जोरदार मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला आहे. आता या वादात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यामुळे  खड्डे सेल्फी विथ ही मोहीम येत्या काळात बरीच रंगणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची सरकार दखल घेत नसल्याने त्या खड्डयांसोबत आपले फोटो काढून ते ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्याची मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा पाटील यांनी धसका घेत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे आश्वासन दिले. त्याच पार्श्वभूमीवर 'सेल्फी विथ खड्डे' ही मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत असताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यात आता उडी मारली असून त्यांनी अंबेजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावर फिरत असताना खड्डयांसोबत सेल्फी काढून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेल्या खड्डे विथ सेल्फीच्या मोहिमेमुळे मंत्री चंद्रकांत पाटील हवालदिल झाले असून त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले आहे. मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली माती, मुरूम  टाकण्याचे प्रकार सुरू असून त्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी मोहीम उघडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com