माझ्या मतदारसंघात नाक खुपसू नका; आमदाराने खासदाराला सुनावले 

विष्णुपुरी प्रकल्प भरल्यानंतर या जलाशयाचे पाणी पुढे सोडण्यापूर्वी या प्रकल्प क्षेत्रातील लहान-मोठे तलाव भरून देण्याची मागणी आमदार हंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच केल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु हीच मागणी खासदार पाटील यांनी मंगळवारी केल्याने आमच्या मतदारसंघात नाक खुपसू नका, अशा शब्दांत आमदार हंबर्डे यांनी खासदार पाटील यांच्या मागणीचा समाचार घेतला.
Mp hemnat patil and nanded mla contrevercey news
Mp hemnat patil and nanded mla contrevercey news

नांदेड - नांदेड शहराजवळ गोदावरी नदीवरील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे सदरील पाणी नदीपात्रात सोडण्याऐवजी लाभक्षेत्रातील तलाव भरुन घ्यावेत, असा सल्ला शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाला नुकताच दिला होता मात्र, या सल्ल्यावर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कॉँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांनी ‘माझ्या मतदारसंघात खासदार पाटील यांनी लुडबूड करु नये‘, असे म्हणत ही मागणी मी मागील महिन्यातच केली असल्याचे सांगितले आहे. 

नांदेड दक्षिणचे कॉँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यात विष्णुपुरीच्या पाण्यावरुन राजकीय वाद सुरु झाला असून आमच्या मतदारसंघाच्या गेटमध्ये डोकावण्याची गरज नाही असा टोला आमदार हंबर्डे यांनी खासदार पाटील यांना लगावला आहे.

विष्णुपुरी प्रकल्प भरल्यानंतर या जलाशयाचे पाणी पुढे सोडण्यापूर्वी या प्रकल्प क्षेत्रातील लहान-मोठे तलाव भरून देण्याची मागणी आमदार हंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच केल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु हीच मागणी खासदार पाटील यांनी मंगळवारी केल्याने आमच्या मतदारसंघात नाक खुपसू नका, अशा शब्दांत आमदार हंबर्डे यांनी खासदार पाटील यांच्या मागणीचा समाचार घेतला.

विष्णुपुरीच्या पाण्यावरून राजकीय वाद व त्यानंतर आता नांदेड दक्षिण मतदारसंघात चर्चेचा पूर आला आहे. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या जलाशयाचे गेट उघडून पाणी सोडले जात असताना खासदार हेमंत पाटील यांनी या जलाशयावर अवलंबून असलेले सर्व तलाव आधी भरून घ्यावेत आणि त्यानंतर गरज वाटली तर जलाशयाचे पाणी सोडावे, अशी सूचना प्रशासनाकडे केली होती. यावर आमदार मोहन हंबर्डे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या सूचनेवर आक्षेप घेत माझ्या मतदारसंघात डोकवू नका, अशी ताकी दिली आहे.

नाचता येईना अंगण वाकडे 

नांदेड दक्षिण मतदारसंघ कोण्या एकाची मालमत्ता नाही. जे काम आमदार या नात्याने तुम्ही करायला पाहिजे होते ते तुम्हाला सुचले नाही. मात्र खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्याप्रती असलेल्या तळमळीपोटी ते केले आहे. त्याबद्दल आमदारांना एवढी पोटदुखी का? असा सवाल शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख (नांदेड दक्षिण) आनंद बोंढारकर यांनी आमदार मोहन हंबर्डे यांना केला आहे
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com