शहराचे नाव बदलून काय होणार? हर्षवर्धन जाधवांचा खैरेंना सवाल 

वीस वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात काय विकास केला? याबाबत काहीच सांगण्या सारखे नसल्यानेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी चंद्रकांत खैरे भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला.
Khaire_Jadhav.
Khaire_Jadhav.

औरंगाबादः " गेली वीस वर्ष औरंगाबादचे संभाजीनगर करा अशी मागणी जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी लावून धरली आहे. पण ते काही त्यांना शक्‍य झाले नाही. योगींनी अलाहाबादचे प्रयागराज केले, मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना औरंगाबादचे नाव का बदलता येत नाही असे विचारणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी आपल्या नेत्यांना सांगून सत्तेतून बाहेर पडावे," असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लगावला आहे .  शहराचे नाव बदलून काय होणार ? असा सवाल देखील  केला. 

हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना करत औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. जिल्हाभरात मेळावे आणि सभा घेत जाधव आणि त्यांचे चिरंजीव आदित्यवर्धन लोकांना आमच्या पक्षात या असे आवाहन करत आहेत. हे करत असतांनाच हर्षवर्धन जाधव यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर देखील टीका करायला सुरूवात केली आहे. 

बुधवारी वैजापूर तालुक्‍यातील एका मेळाव्यात हषवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाचा संदर्भ देत खैरेंवर तोफ डागली. ते म्हणाले, " निवडणुका आल्या की लगेच खैरेंना औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची आठवण कशी येते? पाच वर्ष या विषयावर ते गप्प बसतात आणि निवडणुकीच्या तोंडावर असे भावनिक मुद्दे उकरून काढत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात."

" मुळात शहराच्या नामकरणाचा विषय आजचा नाही. 1999 मध्ये जेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते तेव्हापासूनचा आहे. मग सत्ता असतांना शहराचे नामकरण का करून घेतले नाही. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  अलाहाबादचे प्रयागराज केल्यावरच यांना औरंगाबादचे संभाजीगर करायची आठवण कशी झाली? "

" शहराचे नामकरण हा मुद्दा तुमच्यासाठी अभिमानाचा आणि स्वाभीमानाचा असेल आणि सरकार ते ऐकत नसेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे,"असा खोचक टोला देखील हर्षवर्धन जाधव यांनी लगावला. मुळात अलहाबाद किंवा औरंगाबादचे नामकरण करून काय साध्य होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com