आमदार कैलास गोरंट्यालांना मंत्री केले नाही; समर्थक भडकले 

जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त होण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांचा राज्यमंत्री मंडळात समावेश निश्चितपणे होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती.
kailas_gorantyal jalna
kailas_gorantyal jalna

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आमदार  कैलास गोरंट्याल यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 

 विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील कोणताही  महत्वाचा  नेता प्रचारसभेला फिरकलेला नसतानाही आमदार  गोरंट्याल यांनी ही निवडणूक  मोठ्या मताधिक्याने जिंकल्यानंतरही श्रेष्ठींकडून मंत्रीमंडळात त्यांचा समावेश न केल्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनिवारी (ता. 4)  सकाळी 11 वाजता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  बैठक जालना शहरातील महेश भवनमध्ये आयोजित करण्यात आली असून या बैठकीत निर्णयक भुमिका घेण्यात येणार आहे.


राज्यात सर्वत्र काँग्रेस पक्षाची पडझड होत असतांना कैलास गोरंट्याल जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत श्री. कैलास गोरंट्याल यांचा अवघ्या 296 मतांनी निसटता पराभव झाला होता. या पराभवानंतरही त्यांनी जालना शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूतपणे उभे करण्यासाठी प्रयत्न सुरुच ठेवले.

त्यामुळेच तीन वर्षापूर्वी झालेल्या नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्षा  संगिता गोरंट्याल यांनी 52 हजारपेक्षा अधिक मतांनी विक्रमी विजय मिळवला  होता. याशिवाय काँग्रेस पक्षाचे 28 नगरसेवक जालना नगर पालिकेत निवडून आणत पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली . 

तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभेशिवाय गोरंट्याल यांनी तब्बल 26 हजार इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवून पक्षाचे  पाळेमुळे अधिक घट केले आहेत.   जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त होण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांचा राज्यमंत्री मंडळात समावेश निश्चितपणे होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती. 

मात्र पक्ष श्रेष्ठींनी मंत्रिमंडळात श्री. गोरंट्याल यांचा समावेश न केल्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस जणांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.या बाबत निर्णय़ाक भुमिका घेण्यासाठी  कार्यकर्ते, माजी आमदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,नगरपालिका सदस्य आजी- माजी पदाधिकारी, सदस्य, विविध आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांची   बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गट नेते गणेश राऊत, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, नगरसेवक महावीर ढक्का, जगदिश भरतिया, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे,  किशोर गरदास, जीवन सले, श्रावण भुरेवाल, आरेफ खान, राजेंद्र वाघमारे, विष्णू वाघमारे, विनोद यादव, वैभव उगले यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com