खैरेंचा पराभव दानवेंच्या जावयाने नव्हे; तर शिवसेना आमदाराने केला : चंद्रकांतदादा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात आपल्या जावयाला मदत केली नाही असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले.
khaire-jadhav-dada
khaire-jadhav-dada

पुणे : "औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जावयाने नव्हे, शिवसेना आमदाराने केला असे म्हणावे लागेल,'' असे भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात आपल्या जावयाला मदत केली नाही असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले. 

चंद्रकांतदादा म्हणाले, "हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे शिवसेनेचे सिटींग आमदार होते. शिवसेनेने त्यांची समजूत काढायला पाहिजे होती किंवा त्यांना नियंत्रणात ठेवायला पाहिजे होते. रावसाहेब दानवे यांनी त्यांना मदत केली नाही. रावसाहेब दानवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. जनसंघाच्या दिवसांपासून ते या विचारधारेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे ते असे काही करतील असे मला तरी वाटत नाही.'' 

"हर्षवर्धन जाधव यांना सुमारे पावणेतीन लाख मते पडली ती शिवसेनेचीच होती. त्यामुळे शिवसेना आमदाराने खैरेंचा पराभव केला असेच म्हणावे लागेल. शिवसेनेच्या बाबतीत चंद्रपूरमध्येही असेच घडले. तेथेही शिवसेनेच्या आमदाराने बंडखोरी केली आणि ते खासदार म्हणून निवडून आले,'' असेही चंद्रकांतदादांनी सांगितले. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com