राजीव सातव यांच्या निवडीमुळे कॉंग्रेसची पक्षांतर्गत समीकरणे बदलली

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार तथा गुजरात राज्याचे काँग्रेस प्रभारी ॲड. राजीव सातव यांची काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातून राज्यसभेवर झालेली बिनविरोध निवड पक्षांतर्गत व विरोधी पक्षातील विरोधकांना धोबीपछाड देणारी ठरली आहे.
राजीव सातव यांच्या निवडीमुळे कॉंग्रेसमधील परंपरेलाही छेद बसला आहे.
राजीव सातव यांच्या निवडीमुळे कॉंग्रेसमधील परंपरेलाही छेद बसला आहे.

कळमनुरी - हिंगोली लोकसभेचे माजी खासदार तथा गुजरात राज्याचे काँग्रेस प्रभारी ॲड. राजीव सातव यांची काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातून राज्यसभेवर झालेली बिनविरोध निवड पक्षांतर्गत व विरोधी पक्षातील विरोधकांना धोबीपछाड देणारी ठरली आहे. राज्यसभेवर केवळ ज्येष्ठ सदस्यांना संधी देण्याच्या परंपरेलाही यामुळे छेद बसला आहे.

मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार तथा गुजरात राज्याचे प्रभारी ॲड. राजीव सातव यांना पक्षाकडून राज्यसभेची संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज्यसभेवर पाठवण्याकरिता पक्षाकडून निवडण्यात येणाऱ्या सदस्‍यांची ज्येष्ठता पाहून संधी मिळणार असल्याचे बोलल्या जात होते. 

मात्र, सातव यांनी २०१४ च्या मोदी लाटेमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मिळवलेला विजय, त्यानंतर लोकसभेमधील कामगिरी याची पक्षाच्या नेत्यांनी नोंद घेतली असेच म्हणावे लागेल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःहून उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत पक्षकार्य करण्याची इच्छा पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केल्याने ही बाब देखील त्याचा राज्यसभा निवडीसाठी पथ्यावर पडली. 

मागील काही वर्षापासून त्यांनी गुजरात येथील पक्षाची घडी उत्तमरित्या बसवुन पक्षाची ध्येयधोरणे विविध आंदोलनाच्या माध्यमातून स्वतः पुढाकार घेत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवेली होती. तेव्हापासूनच सातव यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. 

काँग्रेस पक्षाला संजीवनी देणारी निवड
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानंतर ॲड. राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले व त्यानंतर पुढील प्रक्रियेत त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. हिंगोली जिल्हा व मतदारसंघाची परिपूर्ण माहिती असलेल्या सातव यांची निवड पक्ष कार्य व पक्ष कार्यकर्त्याला संजीवनी देणारी ठरली आहे. 

ॲड. सातव यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अल्पावधीत घेतलेली झेप पाहता त्यांनी मागील काही दिवसांपासून पक्ष कार्य करीत असताना या कार्यामधून पक्षात आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीमधून त्यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

दुसऱ्या बाजूला त्यांच्या निवडीमुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलल्या गेली आहेत. त्यामुळे विरोधक काहीसे धास्तावले आहेत. सातव मिळालेल्या संधीचे सोने करतील यावर त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com