पैठणमध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी  शिष्याला दिला धोबीपछाड ! 

sandipan_bhumre_shiv
sandipan_bhumre_shiv

पैठण : पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी पाचव्यांदा विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे.

राष्ट्रवादीने भाजपमधून आयात केलेल्या दत्ता गोर्डे या भुमरे यांच्या शिष्यालाच मैदानात उतरवले होते. पण गुरूने शिष्याचा पराभव करत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. दत्ता गोर्डे यांचा भुमरेंनी 14139 मतांनी पराभव केला. भुमरे यांना 83403, तर गोर्डे यांना 69264 मते मिळाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या दत्ता गोर्डे यांना पक्षात घेऊन पैठणची उमेदवारी दिली होती. संदीपान भुमरे यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप करत गोर्डे भाजपमध्ये गेले होते. पण युती झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या आशा मावळल्या होत्या. राष्ट्रवादीने मात्र हे हरले आणि कधीकाळी भुमरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या दत्ता गोर्डे यांनाच थेट मैदानात उतरवले.

गोर्डे यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले आणि पाच वर्षापासून मतदारसंघाची नव्याने बांधणी करणारे माजी आमदार संजय वाघचौरे यामुळे नाराज झाले. त्यामुळे दत्ता गोर्डे यांना प्रचाराचा गाडा एकट्यालाच ओढावा लागल्याचे चित्र पैठणमध्ये होते. अखेर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला, पैठणकरांनी पुन्हा भुमरे यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांना निवडूण दिले. निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान, भुमरे यांच्यावर विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले, पण भुमरे यांनी त्याला तालुक्‍यात केलेल्या विकासकामांचा हवाला देत प्रत्युत्तर दिले.

पहिल्या फेरीपासूनच भुमरे यांनी मतांची आघाडी घेतली. यानंतर तिसऱ्या व चौथ्या फेरीतही मतांची आघाडी कायम राहिली. मतमोजणीच्या एकुण 24 फेऱ्यांपैकी 13 व 21 व्या फेरीत गोर्डे यांनी चांगली मते घेतल्याने भुमरे यांची आघाडी काहीशी घसरली. पण पुन्हा भुमरे यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com