आमदार संगीता पाटलांकडून बदनामी प्रकरणी सेनेच्या विलास पाटलांवर गुन्हा दाखल 

'बीए'च्या परिक्षेला आमदार नव्हे तर 'डमी' उमेदवार उत्तर पत्रिका लिहीत असल्याची तक्रार सुरतच्या शिवसेना शहरप्रमुखांनी केली होती. यातून बदनामी, मानहानी केल्या प्रकरणी सुरतमधील भाजपच्या आमदार संगीता पाटील यांनी आज (रविवार) सेनेचे विलास पाटील यांच्याविरूध्द सोनगीर (ता. जि. धुळे) येथील पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
आमदार संगीता पाटलांकडून बदनामी प्रकरणी सेनेच्या विलास पाटलांवर गुन्हा दाखल 

सोनगीर : 'बीए'च्या परिक्षेला आमदार नव्हे तर 'डमी' उमेदवार उत्तर पत्रिका लिहीत असल्याची तक्रार सुरतच्या शिवसेना शहरप्रमुखांनी केली होती. यातून बदनामी,  मानहानी केल्या प्रकरणी सुरतमधील भाजपच्या आमदार संगीता पाटील यांनी आज (रविवार) सेनेचे विलास पाटील यांच्याविरूध्द सोनगीर (ता. जि. धुळे) येथील पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

सुरतमधील विस्तारीत लिंबायत मतदारसंघाच्या आमदार संगीता पाटील यांनी सोनगीर पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे, की चार वर्षांपासून मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. सोनगीर केंद्रावरूनच बारावीनंतर 'बीए'ची पदवी घेत आहे. त्यासाठी नियमितपणे परिक्षाही देत आहे. मी मूळ महिला परिक्षार्थी असतानाही शुक्रवारी (ता. 1) दुपारी बारानंतर 'डमी' उमेदवार पेपर देत असल्याची बतावणी करत सुरतमधील शिवसेनेचे शहरप्रमुख विलास पाटील हे परिक्षा खोलीत आले. त्यांनी मला परिक्षेत अडथळा आणला. या प्रकारातून माझी नाहक बदनामी केली. माझ्याविषयी अपप्रचार केला. त्यामुळे भारतीय दंडसंहितेच्या कलम 500 अन्वये विलास पाटील यांच्याविरूध्द  मानहानीच्या दाव्याची तक्रार दाखल करावी. 

दोघात आता कायदेशीर लढाई
या आशयाच्या अर्जान्वये सोनगीर पोलिसांनी विलास पाटील यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 अन्वये हे मानहानीच्या दाव्याचे प्रकरण आता न्यायालयात जाणार असल्याने आमदार संगीता पाटील आणि विलास पाटील हे कायदेशीर लढाईसाठी आमनेसामने येतील. आमदार संगीता पाटील यांचे सासर कळमसरे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील असून त्या सोनगीर येथील बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाशी संलग्न मुक्त विद्यापीठ केंद्राच्या परिक्षार्थी आहेत. 'बीए'च्या अंतिम तिस-या वर्षाची परिक्षा आमदार पाटील या देत आहेत. त्यांनी शुक्रवारी राज्यशास्त्र - भाग 1 आणि शनिवारी याच विषयाची भाग 2 ची परिक्षा दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com