तानाजी सावंतांनी अखेर सोडले मौन (व्हिडिओ)

तुळजापूर येथे भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यानी पहिल्यांदा मी नाराज नाही, पण उस्मानाबाद जिल्ह्याचे हे दुर्देव असल्याची खंत त्यानी बोलुन दाखविली. भविष्यात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा अन्याय दूर करतील, जिल्ह्याच्या पदरात माझ्या किंवा अन्य कोणाच्या माध्यमातून हा अपेक्षाभंग दुर करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
Tanaji Sawant in front of the Media after long time
Tanaji Sawant in front of the Media after long time

उस्मानाबाद : उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात माजी मंत्री  परंडा मतदारसंघातील आमदार प्रा. तानाजी सावंत यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज असुन पक्षापासुन फारकत घेणार अशी चर्चा होती त्यावर प्रा. सावंत यांनी अखेर मौन सोडले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यावर फारकाळ अन्याय होऊ देणार नाहीत, असे सूचक विधान केले.

तुळजापूर येथे भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर सावंत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  तेव्हा त्यानी पहिल्यांदा मी नाराज नाही, पण उस्मानाबाद जिल्ह्याचे हे दुर्देव असल्याची खंत त्यानी बोलुन दाखविली. भविष्यात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा अन्याय दूर करतील, जिल्ह्याच्या पदरात माझ्या किंवा अन्य कोणाच्या माध्यमातून हा अपेक्षाभंग दुर करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मी नाराज आहे ही मीडियानेच उडविलेली हुल होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशा बातम्या दिल्या जात होत्या. मी कधीच नाराज आहे असे बोललो नव्हतो. जे घडले तो आमच्या पक्षातील अंतर्गत विषय होता. चारभिंती आड मला जे सांगायचे होते ते सांगितले, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्री पद दिले नसल्याने पक्षविरोधात जाऊन प्रा. सावंत यानी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडणुकीत विरोधी भाजपच्या गटाला साथ दिली होती.  त्यावेळी त्यांनी त्यांच्या पुतण्यास उपाध्यक्ष तर शिवसेना जिल्हा समन्वयक दत्तात्रय साळुंखे यांना कृषी व पशुसंवर्धन चे सभापती पद पदरात पाडून घेतले. शिवाय औरंगाबाद येथील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यानंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली तिथेही गैरहजर राहुन प्रा. सावंत यांनी आपली नाराजी दाखवुन दिली होती. पण आता ते पुन्हा मतदारसंघात सक्रीय झाले असुन यापुढील काळात त्यांचे व मुख्यमंत्री ठाकरे यांचे सबंध कसे राहणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com