विधानसभा २०१९ -उस्मानाबाद जिल्हा : गेल्या वेळच्या जागा टिकवण्याचे आघाडीसमोर आव्हान

जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे. तुळजापूरमध्ये दोन आमदारांमध्ये आहे.
Tanaji Sawant - Rahul Mote
Tanaji Sawant - Rahul Mote

जिल्ह्यात आघाडीतून चारपैकी उस्मानाबाद, परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर व उमरगा कॉंग्रेसकडे आहेत. युतीमधून उस्मानाबाद, परंडा आणि उमरगा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर तुळजापूर भाजपकडे आहे. उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, एसपी शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या नावांची राष्ट्रवादीकडून चर्चा आहे. येथे शिवसेनेकडून उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, जिल्हा उपप्रमुख अजित पिंगळे इच्छुक होते. मात्र शिवसेनेने जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. इच्छुक असूनही उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज असलेल्यांची भूमिका काय, याची उत्सुकता आहे. संभाजी ब्रिगेडकडून डॉ. संदीप तांबारेंनी अर्ज दाखल केलाय. वंचित बहुजन आघाडीकडून धनंजय शिंगाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तुळजापूरमध्ये कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. १९९९ पासून २०१४ पर्यंतच्या निवडणुकीत येथून कॉंग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाणांनी सलग विजय मिळवलाय.

     मधुकरराव चव्हाण    राणा जगजितसिंह पाटील

त्यामुळेच कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेशलेल्या माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटलांना येथून उमेदवारी मिळाली आहे. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. अनिल काळे हेही भाजपकडून इच्छुक होते. पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत रोचकरी यांनी माघार घेऊन राणाजगजितसिंह यांना पाठिंबा दिलाय. 

नळदुर्गचे उद्योजक अशोक जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे दोन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीत आहेत. जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात असण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशांत नवगिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे चौरंगी लढतीची शक्‍यता आहे.

        ज्ञानराज चौगुले

उमरग्यावर २००४ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार ज्ञानराज चौगुलेंनी सलग दोनदा विजय मिळवलाय. या वेळीही तेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. लोकसभेवेळी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही. त्याचे पडसाद येथे उमटलेत. तेव्हापासून शिवसेनेतील एक गट चौगुलेंविरोधात सक्रिय आहे. त्याच्याशी जुळवून घेण्याचे आव्हान चौगुलेंसमोर आहे. कॉंग्रेसकडून दिलीप भालेराव, जालिंदर कोकणेंच्या नावाची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीकडून रमाकांत गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.

परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंनी सलग तीन निवडणुकीत विजय मिळवलाय. यंदा त्यांच्यासमोर शिवसेनेचे जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आव्हान असेल. परंडा, भूम आणि वाशी असे तीन तालुके मतदारसंघात आहेत. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंनी तिन्ही तालुकाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार मोटेंना परिश्रम घ्यावे लागतील. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर, भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांचेही प्रयत्न होते. या मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरीची शक्‍यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काकासाहेब मारकड यांच्या नावाची चर्चा आहे.

आव्हान 'वंचित'चेही
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतून मताधिक्‍य मिळाल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादेत घेतलेल्या संवाद मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळालंय. गेल्या वेळी जिल्ह्यातील या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला दोन, शिवसेना आणि कॉंग्रेसला प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या तिन्ही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com