महापौर नंदकुमार घोडेले फाड फाड इंग्लिश का बोलले ?

महापौर इंग्लिशमध्ये कशासाठी बोलले याचा बोध अनेकांना या मागणीनंतर झालं .
aurangabad
aurangabad

.औरंगाबाद :  'पानी रे पानी' स्वभाव म्हणुन ख्याती असलेले औरंगेबादेतील शिवेसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपण  मराठी बाणा जपणारे असल्याचे सांगत इंग्रजी अंदाज दाखवला. प्रसंग होता स्कोडा ऑटो इंडीयामधील सौरउर्जा प्रकल्पाच्या उदघाटनाचा.

या कार्यक्रमासाठी स्कोडाच्या  परदेशातून आलेल्या वरिष्ठाना कळावे म्हणून आपण इंग्लिश बोलत आहोत असे सांगत त्यांनी तीन मिनिटांच्या आपल्या भाषणात औरंगाबाद महापालिकेला कंपनीने  सीएसआर फंड द्यावा अशी मागणीही करून टाकली . 

महापौर इंग्लिशमध्ये कशासाठी बोलले याचा बोध अनेकांना या मागणीनंतर झालं .

'पानी रे पानी तेरा रंग कैसा' अशा स्वभावाची ख्याती असलेले शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले हे कधी आपल्या हिरव्या कुर्त्यावरुन आमदार इम्तियाज जलील यांचे लक्षे वेधतात तर कधी ट्रॅकपॅंट टि शर्ट घालुन वॉर्ड पालथे घालत लोकांमध्ये मिसळतात. अशा महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. 17) इंग्रजीत भाषण करुन सर्वांनाच सुखद धक्का दिला. 

एका उद्योगाच्या सौरउर्जा प्रकल्पाच्या उदघाटनाचे अध्यक्षपद भुषवताना त्यांनी सुमारे तीन मिनीटे इंग्रजीतुन भाषण करत कॉर्पोरेट कल्चरही आपल्याला मानवते याची चुणुक दाखवली. झेक रिपब्लिकचे राजदूत मिलान होवार्का यांच्या उपस्थिीत पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांनी इंग्रजी भाषण करण्यामागील आपली भुमिका स्पष्ट केली. 

शिवसेना हा पक्ष मराठीचा पुरस्कर्ता आहे, मी शिवसेनेचा महापौर असल्याने माझे भाषण मराठीत होणे अपेक्षित आहे. मात्र कार्यक्रमाचे स्वरुप आणि उपस्थित पाहुणे पाहता आपला संदेश त्यांना कळण्यासाठी आपण इंग्रजीतुन बोलणार असल्याचे त्यांनी पहिल्या पाच वाक्‍यातच स्पष्ट केले.

महापालिकेसाठी स्कोडा ऑटो इंडीयाने सीएसआर फंड द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी करुन टाकली, आणि कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, ज्यानंतर राजदूत होवार्का यांनीही टाळ्या वाजवुन त्यांना दिलखुलास दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com