दत्ताजी नलावडेची "वरळी' आदित्यमुळे पुन्हा प्रकाशझोतात ! 

दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व एकेकाळी कॉंग्रेसचे शरद दिघे आणि शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांनी केले होते. आताही आमदार शिवसेनेचाच आहे. आदित्य यांच्यासाठी पक्षाने सुपीक जमीन तयार केलीय. मराठी माणसांबरोबरच दत्ताजींच्या वरळीतून जर आदित्य मैदानात उतरले तर तो ही इतिहास होईल.
warali dattaji nalawade aditya thackrey
warali dattaji nalawade aditya thackrey

ठाकरे घराण्यातील कोणीही आजपर्यंत निवडणूक लढले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत युवा नेते आदित्य मैदानात उतरण्याची जोरदार तयारीही पक्षाने सुरू केली आहे. खरंतर आदित्य वरळीच काय मुंबईतील कोणत्याही मतदारसंघातून निवडूण येऊ शकतात.

मात्र वरळीचीच का चर्चा सुरू आहे. कसा आहे वरळी मतदारसंघ यापूर्वी कोणी येथून निवडणूक लढविली याचीही उत्सुकता अर्थात महाराष्ट्राला आहे. 

भाजपापेक्षा शिवसेनेची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. वरळी हा शिवसेनेचा बळकट गड आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्यामुळे शिवसेनेचा इथला मतदान हलणार नाही हा आत्मविश्वास आहे. त्यात अहिर यांचीही भर पडली आहे. इथल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांनी आदित्य यांना एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय. 

आदित्य निवडणुक लढल्यास निवडणूक लढविणारे ठाकरे कुटुंबातील ते एकमेव सदस्य ठरतील. कॉंग्रेसचे माजी खासदार शरद दिघे येथूनच आमदार म्हणून निवडून आले होते. ते ही विधानसभेचे अध्यक्ष होते. 1990 च्या दशकात शिवसेनेचे नेते, माजी महापौर, विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.

तसेच  कॉंग्रेसची किंवा भाजपची स्वबळावर निवडून येण्याची इथं ताकद नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आदित्य येथून निवडणूक लढल्यास त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. निवडणुकीत मनसेला कॉंग्रेस आघाडीने जरी पाठिंबा दिला तरी त्यांचा पराभव करणे सोपे नाही. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून जरी आदित्य यांची ओळख असली तरी वरळी मतदार संघात तसेच राज्याच्या विविध भागात सुरू असलेली त्यांची जनआशीर्वाद यात्रा आणि विजयी संकल्प मेळाव्याना सर्व थरातून मिळणारा वाढता त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करीत आहे.

विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, सहकार यांच्या प्रश्ननाना ते भिडत आहेत. समुदायाकडे आशीर्वाद मागत आहेत. नवा देश आणि नवा महाराष्ट्र घडविण्याची ते भाषा करीत राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. लोकांमध्ये, तरुणांमध्ये ते मिसळत आहेत. लोकांमध्ये मिसळून त्यांच 

वरळी हा मतदारसंघ मुंबईचे हृदय म्हणून ओळखला जातो. वरळी बीडीडी चाळींचा, वरळी कोळीवाड्याचा, वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास, पोलीस वसाहतीचा प्रश्न, जुन्या चाळीचे प्रश्न, झोपडपट्टयांचा विकास असे अनेक प्रश्न या मतदार संघात आहेत. येथील नागरिकांचे प्रश्न आदित्य यांनी जाणून घेतले आहेत. पूर्वीच्या गिरणगावाचा भाग असे वैशिष्ट्य असलेल्या या भागात मराठी टक्का इथं मोठा आहे.

 शिवसेनेच्या चार नगरसेवकांचे पाठबळ आदित्य यांच्या पाठीशी राहू शकते. भाजप स्वतंत्र लढले, दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली किंवा वंचित बहुजन आघाडी असली तरी शिवसेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहील आणि शिवसेना आदित्य यांना भरघोस मतांनी निवडून आणील असेच सध्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com