लोकशाही धोक्यात असल्याची टीका लोकशाही असलेल्या जवळजवळ प्रत्येक देशात कधी ना कधी होत असते. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून अमेरिकेतील लोकशाहीला त्यांच्यापासून धोका असल्याचा सूर सातत्याने लावण्यात येतो. कितीही टीका झाली तरी त्याला भीक घालायची नाही हे ट्रम्प यांचे धोरण असल्याने त्यांच्या टीकारांची संख्याही मोठी आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी हे नात त्यात आघाडीवर आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांना धारेवर धरण्याची एकही संधी पेलोसी सोडत नाही. पेलोसी या अमेरिकी संसदेतील कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा आहेत. ट्रम्प आणि पेलोसी यांच्यातील राजकीय सामना नुकताच अमेरिकी संसदेत पहायला मिळाला.
ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित केले. या भाषणाला स्टेट ऑफ द युनियन असे म्हटले जाते. तर भाषणाच्या सुरवातीलाच पेलोसी यांनी सिरस्त्याप्रमाणे अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी हात पुढे केला. मात्र ट्रम्प यांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष्य केल्याचे दृश्य कॅमेऱ्यांनी टिपले आहे साऱ्या जगाने पाहिले. राजकारणात मुरलेल्या 79 वर्षांच्या पेलोसी यांनी अवघ्या काही मिनिटांमध्येच ट्रम्प यांनी केलेल्या अपमानाची जाहीर परतफेड केली. ट्रम्प यांचे भाषण संपताच पेलोसी यांनी त्या भाषणाची प्रत फाडून टाकली.
अध्यक्षांचे भाषण त्यांच्याच उपस्थित फाडून टाकण्याचे मोठे धाडस पेलोसी यांनी दाखविले. मात्र पेलोसी यांना ओळखणाऱ्यांना यात काहीही आश्चर्य वाटले नाही. कारण प्रतिनिधिगृहात ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला चालविण्यास मान्यता देणाऱ्या पेलोसी याच होत्या. याच पेलोसी यांनी 1918 मध्ये प्रतिनिधिगृहात निर्वासितांच्या प्रश्नावरील चर्चेवेळी तब्बल आठ तास सात मिनिटे भाषण करून विक्रम प्रस्थापित केला होता.
अमेरिकेतील बाल्टिमोर येथे 26 मार्च 1940 रोजी जन्मलेल्या पेलोसी या प्रतिनिधिगृहाच्या 63व्या अध्यक्षा आहेत.2007 ते 2011या कालावधीतही त्यांच्याकडे याच पदाची जबाबदारी होती. 1993 पासून 17 वेळा पेलोसी या संसदेवर निवडून गेल्या आहेत. वॉशिंग्टनमधील सर्वात शक्तीशाली महिला म्हणूनही पेलोसी यांच्याकडे पाहिले जाते.
गृहिणी ते अमेरिकी राजकारणातील मोठ्या नेत्या हा पेलोसी यांचा प्रवासही कौतुकास्पद आहे. बॅंकर म्हणून काम केलेल्या पेलोसी या पाच मुलांच्या आई आहेत. अमेरिकी संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवरील निर्णयांना आकार देण्यात पेलोसी आघाडीवर होत्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मोठा निधी जमा करण्यात पेलोसींचा हातखंडा आहे. अमेरिकेच्या राजकारणातील हिलरी क्लिंटन यांच्यानंतरच्या पेलोसी या महत्त्वाच्या महिला नेत्या ठरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.