Ajit Pawar: अजितदादांनी पहिल्यांदा विधानसभा नव्हे, लोकसभा निवडणूक लढवली होती..कारण महितीये?

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची ही पाचवी टर्म आहे.
Ajit Pawar, Sharad pawar
Ajit Pawar, Sharad pawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: बेधडक अन् स्पष्टवक्तेपणासाठी अजित पवार ओळखले जातात. राजकारणात 'दादा'म्हणून ओळखले जाणाऱ्या अजित पवारांनी ४१ वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनात अनेक महत्वाची पदे भूषवली. साखर कारखाना संचालक , जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष, आमदार, उपमुख्यमंत्री अशा विविध पदावर त्यांनी केलेली कामे सर्वश्रृत आहेत. पण अजितदादांनी लोकसभा निवडणूक लढवली होती हे फार कमी जणांना माहित आहे. अजितदादांच्या खासदारकी बाबत जाणून घेऊया.

महाराष्ट्रात राजकारणात गेल्या काही महिन्यात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यात अजितदादांचा पहाटेचा शपथविधी, आपले काका शरद पवार यांची साथ सोडून केलेली राष्ट्रवादीतील बंडखोरी, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी सामील झाले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत चार मतदार संघात अजित पवार गट आपले उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अजित पवार आणि बारामती लोकसभा निवडणूक म्हटली की त्यांची खासदारकी आठवते. अजित दादा खासदार कसे झाले. हे जाणून घेऊया..

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार हे 1991 मध्ये निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. अजित पवार यांना पहिल्या निवडणुकीत 4 लाख 37 हजार 293 मते मिळाली होती. तर प्रतिभा लोखंडे यांना 1 लाख 1 हजार 30 मतांवर समाधान मानावं लागलं होते.

अजितदादांची एन्ट्री लोकसभेत झाली, पण त्यांची खासदार म्हणून कारकिर्द फार काळ टिकली नाही. पंतप्रधान पी. व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे संरक्षणमंत्री झाले. शरद पवार तेव्हा संसदेचे सदस्य नव्हते सहा महिन्यांमध्ये त्यांना सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक होते. यामुळे अजित पवारांनी शरद पवारांसाठी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शरद पवार हे बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती विधानसभा लढवून राज्याच्या राजकारणात एन्ट्री घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेल्या अजितदादांनी काका शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले आहे. अजित पवारांनी गेल्या 5 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्कादायक होती. 1995 1999 2004 2009 2014 आणि 2019 मधील निवडणुका जिंकून ते आमदार झाले. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची ही पाचवी टर्म आहे.

1982 मध्ये अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला. आज राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजितदादाचं नाव आदरानं घेतलं जाते. शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांची मंत्री म्हणून जबाबदारी अजितदादांनी सक्षमपणे सांभाळली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे अजितदादांनी भूषवली आहेत.

१९९१ मध्ये अजितदादा हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर १९८२ मध्ये जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश केला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये ते निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले.

Ajit Pawar, Sharad pawar
Parliament Security Breach: सागरच्या डायरीतून उलगडताहेत अनेक गुपितं; ते 30 फोन नंबर कुणाचे? 'सरफरोशी की तमन्ना...'

पद्मसिंह पाटलांच्या बहीणीशी विवाह

शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे अजित पवार हे सुपुत्र आहेत. राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी अजितदादांचा विवाह झाला. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले.त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी.कॉम.पदवी आहे.

आगामी निवडणुकीत तगडं आव्हान...

गेली तीन दशकं विधानसभेचे आमदार असलेले अजित पवार यांनी आता आपले काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध बंड पुकारलंय. आजवर बारामतीची निवडणूक विक्रमी मताधिक्यानं जिंकणाऱ्या अजित पवार यांना आगामी निवडणुकीत तगडं आव्हान असणार आहे. अजित पवार गटाकडून आगामी बारामती लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. उमेदवारांचे नाव अद्याप नक्की झाले नसले तरी १९९१ नंतर पुन्हा एकदा बारामती लोकसभा जिंकण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com