तालिबानमध्ये यादवी : सर्वेसर्वा अखुंजादाचा मृत्यू तर उपपंतप्रधान ओलीस?

अफगाणिस्तानात तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये यादवी माजल्याचे समोर येऊ लागले आहे.
Haibatullah Akhundzada, Mullah Baradar
Haibatullah Akhundzada, Mullah Baradar

काबूल : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानमध्ये (Taliban) अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हिबातुल्ला अखुंजादा याचा आधीच मृत्यू झाल्याचे वृत्त असून, देशाचा उपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Baradar)याला ओलीस ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये यादवी माजल्याचे समोर येऊ लागले आहे.

बरादर हा काही दिवसांपासून गायब झाला आहे. यामुळे त्याच्या गायब होण्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवासात तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये वाद झाला होता. या वादात गोळीबार झाला होता. यानंतर बरादर याला कंदाहारमध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळामध्ये तालिबानमधील नेत्यांचाच समावेश आहे. पूर्वीच्या अफगाण सरकारमधील नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान, सध्या तालिबानचा सर्वोच्च नेता असलेल्या मुल्ला हबितुल्ला अखुंजादा यानेच पंतप्रधानपदासाठी मोहम्मद हस अखुंद याचं नाव पुढे केल्याचं वृत्त आहे. अखुंजादा याचं सरकारवर नियंत्रण राहणार आहे. अखुंद याच्याकडं पंतप्रधान पद असलं तरी अखुंजादाच्या हस्तक्षेपाशिवाय महत्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत.

दरम्यान, तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हबितुल्ला याचा आधीच मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. कारण तालिबानने सत्ता मिळवून एवढे दिवस झाल्यानंतरही तो समोर आलेला नाही. एक नेता नसतानाही तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याची चर्चा सुरू आहे. मुल्ला हिबातुल्ला हा 1990 मध्ये तालिबानमध्ये दाखल झाला. तो मूळचा कंदाहारचा असल्याचं सांगितलं जातं. सध्याही तो तिथंच असल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. 1995 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याच्यावर देशाचा गुन्ह्यांचा आलेख कमी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 2015 मध्ये तालिबानच्या उपप्रमुख बनला होता.

Haibatullah Akhundzada, Mullah Baradar
अखेर दोन महिन्यांनंतर राज कुंद्राने टाकलं तुरुंगाबाहेर पाऊल अन्...

मुल्ला हिबातुल्लाचा मुलगा आधीपासूनच तालिबानशी जोडला गेला होता. तो तालिबानचा प्रमुख होण्यापूर्वी तालिबानच्या आत्मघातकी पथकामध्ये होता. पण हिबातुल्ला याने प्रमुख झाल्यानंतरही त्याच्या मुलाला या पथकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. एका दहशतवादी हल्ल्यामध्येच त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालिबानमध्ये हिबातुल्लाविषयी आदराची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com