काँग्रेस अॅक्शन मोडवर; पंजाबमध्ये प्लॅन बी तयार

पंजाबमध्ये राजीनामासत्र सुरू असल्याने काँग्रेस नेतृत्वाने तातडीने पक्ष प्रभारींना पाठवले आहे. याचबरोबर पक्षाने प्लॅन बी तयार ठेवला आहे.
Congress
Congress
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामासत्र सुरू असल्याने काँग्रेस नेतृत्वाने तातडीने पक्ष प्रभारींना पंजाबमध्ये पाठवले आहे. याचबरोबर पक्षाने प्लॅन बी तयार ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी तातडीने पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांच्याशी चर्चा केली आहे. चन्नी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली. यानंतर बोलताना त्यांनी या वादातून लवकरच मार्ग निघेल, असे संकेत दिले आहेत.

सिद्धू यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला आहे. यामुळे काँग्रेस नेतृत्वाने प्लॅन बी तयार ठेवला आहे. सिद्धूंच्या मागे जाऊन फरफट करून घेण्याची पक्ष नेतृत्वाची इच्छा नाही. यामुळे पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसरा नेता नेमणार आहे. यासाठी आमदार कुलजितसिंग नागरा आणि पक्षाचे खासदार रवनीतसिंग बिट्टू या दोघांची नावे चर्चेत आहेत. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपला असून, सिद्धू यांच्यावर आता विश्वास ठेवण्याची जोखीम नेतृत्व स्वीकारणार नाही. त्यांनी अचानक राजीनामा देऊन नेतृत्वालाच तोंडघशी पाडले आहे. यामुळे सिद्धूंच्या जागी या दोनपैकी एका नेत्याची निवड निश्चित मानली जात आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Congress
सिद्धूंच्या राजीनाम्याने अडचणीत आलेल्या काँग्रेसवर कॅप्टन टाकणार डाव?

सिद्धू यांनी आज एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, माझी लढाई ही मुद्द्यावर आहे आणि त्यावर खूप काळापासून ठाम आहे. पंजाबच्या विकासाच्या अजेंड्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी कधीही हाय कमांडची दिशाभूल केलेली नाही अथवा दिशाभूल होऊ दिलेली नाही. माझ्या तत्वांसाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. कलंकित मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यावेळी ही व्यवस्था ही मोडून काढली. अशा प्रकारच्या निवडीला माझा विरोधच राहील.

Congress
मोठी बातमी : मुख्यमंत्री जगनमोहन संपूर्ण मंत्रिमंडळालाच देणार डच्चू

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com