नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसला धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदरसिंग यांनी आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा आज केला.
सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंगानी ट्विट केले आहे. आपले भाकित खरे ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा माणूस अस्थिर असून, पंजाबसारखे सीमावर्ती राज्य चालवण्यास तो लायक नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्री बनवण्यास अमरिंदरसिंग यांनी आधी जोरदार विरोध केला होता. याचबरोबर सिद्धूंबाबत पक्ष नेतृत्वाला इशारा देत भविष्यवाणीही केली होती.
अमरिंदरसिंग म्हणाले होते की, सिद्धू हे मूर्ख, जोकर आणि ड्रामाबाज आहेत. सिद्धू हा ड्रामा करुन केवळ गर्दी जमवू शकतो. त्याला गर्दी जमवता आली तरी तो मते मिळवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी त्याच्यावर फक्त भटिंडा आणि गुरदासपूरची जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी त्याने प्रचार केला पण दोन्ही जागा काँग्रेस हारली. सिद्धू हरला अथवा जिंकला तरी मी त्याला विरोध करीत राहणार आहे. जो एक मंत्रालय चालवू शकला नाही तो पूर्ण पंजाब काय चालवणार?
देशाच्या हितासाठी मी सिद्धू याची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यास विरोध करीत आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सिद्धूचे चांगले मित्र आहेत. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी सिद्धूचे संबंध आहेत. नवज्योतसिंग सिद्धू हा अकार्यक्षम व्यक्ती आहे. तो मोठे संकट निर्माण करेल. त्याचे पाकिस्तानशी संबंध आहेत. तो राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका ठरेल, असाही इशारा अमरिंदरसिंग यांनी दिला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.