राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये नवी फायरब्रँड एंट्री : कॉम्रेड कन्हैया अन् जिग्नेश मेवानी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील एकेक मोहरा गळून पडत असताना त्यात आता दोन फायरब्रँड नेत्यांची एंट्री होत आहे.
Kanhiaya Kumar, Jignesh Mevani
Kanhiaya Kumar, Jignesh MevaniSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील एकेक मोहरा गळून पडत असताना त्यात आता दोन फायरब्रँड नेत्यांची एंट्री होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात ओळख असलेले दोन तरुण चेहरे आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) तसेच, गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांचा समावेश आहे.

महात्मा गांधी जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. परंतु, हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अलिकडे आणण्यात आला आहे. हे दोघेही आज हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. या दोघांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय आक्रमक आणि लोकप्रिय असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसला मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Kanhiaya Kumar, Jignesh Mevani
राज्यात मंत्रिपद मिळालेले माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, राजकारणात प्रमोशन, डिमोशन काही नसतं!

देशातील लोकप्रिय तरुण नेता कन्हैया

कन्हैया कुमार याने 2019 मध्ये भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांच्याविरोधात बिहारमधील बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत कन्हैयाचा पराभव झाला होता. मागील तीन दशकांपासून बिहारमधील काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवलेल्या 70 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या.

कन्हैया व राहुल गांधी यांची आधी दोनदा भेट झाली आहे. काँग्रेसमध्ये येण्याबाबत वाटाघाटी सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आहेत, असे बिहारमधील काँग्रेसच्या एका नेत्यानं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. कन्हैया कुमार हा मूळचा बिहारचा असल्यानं या राज्यात त्याच्यामागे कार्यकर्त्यांची फौज आहे. तसेच, काँग्रेसमध्ये येता डाव्या पक्षांती काही नेतेही त्याच्यासोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Kanhiaya Kumar, Jignesh Mevani
ममतांच्या विरोधातील प्रचारातून भाजपच्या खासदार गायब

गुजरातमधील दलित चेहरा मेवानी

गुजरातमधून जिग्नेश मेवानी यांना प्रवेश देत काँग्रेस एका दगडात दोन पक्षी मारणार आहे. मेवानी यांना मानणारा मोठा दलित वर्ग आहे. मागील निवडणुकीतही काँग्रेसनं त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. मेवानी काँग्रेसमध्ये आल्यास दलित चेहरा मिळणार आहे. त्यांना काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.

गुजरातमधील मागील निवडणुकीत काँग्रेसचा निसटता पराभव झाला होता. ही कसर भरून काढण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. गुजरामध्ये 2022 मध्ये विधानसभा तर देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसकडून प्रत्येक राज्यात ताकद वाढविण्यासाठी तरूण नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये बिहार व गुजरातमध्ये पहिलं यश मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com