महाराष्ट्रानंतर आता राजस्थान! मुख्यमंत्र्यांचे बंधू अडकले ईडीच्या फेऱ्यात

भाजपच्या सत्ता नसलेल्या राज्यांत केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय असल्याची टीका होत असताना असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) सत्ता नसलेल्या राज्यांत केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय असल्याची टीका होत आहे. महाराष्ट्रानंतर आता राजस्थानमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेसशासित (Congress) राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा (Chief Minister) बंधू आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकला आहे. या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्र्यांच्या बंधूंचे घर आणि कार्यालयांवर आधी छापेही मारले होते.

या सर्व घडामोडीमुळे पक्षांतर्गत वादाने आधीच जेरीस आलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehllot) यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे बंधू अग्रसेन गेहलोत (Agrasen Gehlot) यांनी ईडीने समन्स बजावले आहे. अग्रसेन यांना आज ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. खत गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. गेल्या वर्षी अग्रसेन यांच्याशी निगडित मालमत्तांवर ईडीने छापेही मारले होते. राजस्थानमध्ये 6 ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये 2 ठिकाणी, गुजरातमध्ये 4 ठिकाणी आणि दिल्लीत 1 ठिकाणी हे छापे मारले होते.

अग्रसेन ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आधी समन्सही बजावले होते. परंतु, ते हजर राहिले नव्हते. मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने अग्रसेन यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र, त्यांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना 2007 ते 2009 या काळात सबसिडी मिळालेली खते निर्यात करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप अग्रसेन यांच्यावर आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

Ashok Gehlot
राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं अन् अखेर आमदार म्हणून झाला गौरव

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com