UPSC Result : महाराष्ट्रातील मुलांनी मिळवलं यश

महाराष्ट्रातून मृणाली अविनाश जोशी ही गुणवत्ता यादीत 36 व्या क्रमांकावर तर विनायक कारभारी नरवडे हा 37 व्या क्रमांकावर आहे.
Parth Kashyap, Nishita jagtap, UPSC
Parth Kashyap, Nishita jagtap, UPSCSarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मृणाली जोशी ही महाराष्ट्रात पहिली तर विनायक नरवडे हा दुसरा आला आहे. बिहारमधील शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला असून जागृती अवस्थी ही देशात मुलींमध्ये अव्वल ठरली आहे.

आयोगाकडून जानेवारी 2021 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुलाखती झाल्या होत्या. त्यानुसार 761 उमेदवार पात्र ठरले आहे. या परीक्षेचा निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा गट अ व गट ब या चार सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगानं 761 जणांची शिफारस केली आहे. त्यापैकी 180 IAS आणि 200 IPS चा समावेश आहे.

Parth Kashyap, Nishita jagtap, UPSC
पुण्याने गाठला कोरोना रुग्णांचा पाच लाखांचा आकडा

शिफारस करण्यात आलेल्या एकूण उमेदवारांपैकी 263 उमेदवार सर्वसाधारण गटातील तर 229 ओबीसी, 122 अनुसूचित जाती आणि 61 अनुसूचित गटातील आहेत. आर्थिक मागास गटातील 86 उमेदवारांची निवड झाली आहे. बिहार येथील शुभम कुमार हा देशात पहिला आला आहे. त्याखालोखाल जागृती अवस्थी ही दुसऱ्या क्रमांकावर असून तिनं मुलींमध्ये देशात पहिलं मिळवलं आहे.

महाराष्ट्रातून मृणाली अविनाश जोशी ही गुणवत्ता यादीत 36 व्या क्रमांकावर तर विनायक कारभारी नरवडे हा 37 व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे विनायक महामुनी, वलय वैद्य, ऋचा कुलकर्णी, कामलकिशोर कंदरकर, नवमी साटम, प्रतिक जुईकर, नितिशा संजय जगताप, साहिल खरे, संकेत वाघे, परमानंद दराडे, आनंद पाटील, सुहास गाडे, पार्थ जगदीश कश्यप यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे.

पुण्यातील पार्थ कश्यप 174 वा क्रमांकावर

पार्थ जगदीश कश्यप युपीएससीची मुख्य परीक्षा पहिल्या प्रयत्नांत यशस्वी झाला. देशपातळीवर त्याचा १७४ वा क्रमांक आहे. त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून त्याची निवड होऊ शकते. तो स्व-रूपवर्धिनीचा विद्यार्थी आहे. पार्थने मंगळवार पेठेतील वर्धिनीच्या रामकृष्ण शाखेचा प्रमुख म्हणून अतिशय उत्तम काम केले आहे.

नितिशा जगतापचं पहिल्याच प्रयत्नात यश

लातूरच्या नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. तिनं देशात 199 वा क्रमांक पटकावला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये लातूरमधील अनेक विद्यार्थी चमकतात. त्यामुळं लातूर पॅटर्न प्रसिध्द झाला आहे. नितीशा जगतापही या पॅटर्नमध्ये शिकलेली विद्यार्थिनी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com