पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ : निलंबित खासदारांची संख्या २३ च्या घरात...

विरोधकांच्या ताकदीला संसदेत मोठा धक्का
Parliament House Latest News, Parliament Monsoon Session
Parliament House Latest News, Parliament Monsoon Sessionsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : लोकसभेतील (Lok sabha) कालच्या 4 खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा ताजा असतानाच आता आज राज्यसभेतील (Rajya Sabha) तब्बल 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेत वेलमध्ये येवून घोषणा दिल्याप्रकरणी आणि सभापतींनी वारंवार सूचना देवूनही न ऐकल्यामुळे नियम 256 च्या उल्लंघनाप्रकरणी (conduct in the Parliament) या खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

या खासदारांमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे 7 खासदार, डीएमकेचे 6, टीआरएसचे 3, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) 2 आणि कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एका खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी ही कारवाई केली आहे. मागील दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनं सुरु केली आहेत.

यामध्ये आज गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. टीएमसीकडून या प्रकरणावर राज्यसभेत चर्चेची मागणी करण्यात आली. पण याबाबत चर्चा करण्यास सभापतींनी परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन करण्यास आणि सभागृहात घोषणाबाजीस सुरुवात केली. वारंवार सांगूनही न ऐकल्यामुळे अखेरीस सभापतींनी कडक कारवाई करत 19 खासदारांवर आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई केली.

दरम्यान, काल लोकसभेतल देखील ४ खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. पण काँग्रेसच्या खासदारांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com