नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष (Congress President) कोण होणार, याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. पण सध्या काँग्रेसच्या पाच खासदारांच्या पत्रामुळे या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Congress President latest news)
कॉंग्रेसचे अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडी आहे. पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुकुल वासनिक (mukul wasnik) यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.
24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असेल, तर अशा स्थितीत 30 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होऊ शकतो.
काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना काँग्रेसच्या 5 खासदारांनी पत्र लिहिले आहे. पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निष्पक्ष निवडणुका न होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शशी थरूर, कार्ती चिदंबरम,मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, अब्दुल खालिक या खासदारांच्या नावांचा यात समावेश आहे. शशी थरूर यांनी यापूर्वीही मधुसूदन मिस्त्री यांना तसे पत्र लिहिले आहे.
पक्षाने कोणतेही गुप्त दस्तऐवज सार्वजनिक करावेत असे आम्ही अजिबात सुचवत नाही, उलट आम्ही निवडणूक लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांची यादी शोधत आहोत, असे या पाच खासदारांनी पत्रात म्हटले आहे. मतदार यादी जाहीर करण्याची त्यांची मागणी चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचेही खासदारांनी मिस्त्री यांना सांगितले.
केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे (सीईए) मुख्य मिस्त्री यांनी ही यादी जाहीर केली जाणार नसल्याचे सांगितले होते. यापूर्वी पक्षाध्यक्ष निवडीवेळीही यादी जाहीर करण्यात आली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता.काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून जोर धरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.