8th Pay Commission : कोणाला मिळणार 8 व्या वेतन आयोगाचा लाभ अन् कोणाचा पत्ता कट? सरकारने स्पष्टच सांगितलं!

8th pay commission latest government update : 8 वा वेतन आयोगाबाबत सरकारने स्पष्ट केले आहे. कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना लाभ मिळणार आणि कोण वंचित राहणार? सविस्तर वाचा.
8th pay commission salary hike update
8th pay commission salary hike updateSarkarnama
Published on
Updated on

8th pay commission eligibility criteria : केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. वेतन, पेन्शन, महागाई भत्ता वाढणार की नाही, कोणाला फायदा होणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

अशातच सोशल मीडियावर एक संदेश जोरात व्हायरल होत असून, त्यामध्ये सरकारने 2025 च्या वित्त कायद्यानुसार पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचे फायदे बंद केल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

8th pay commission salary hike update
Congress leader : "काँग्रेसला 'झिरो' करण्याचा विडा! अशोक चव्हाणांनी थेट 'हुकमी एक्का'च फोडला; भाजपच्या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ."

व्हायरल होत असलेल्या या संदेशामध्ये एक कथित सरकारी दस्तऐवजही जोडलेला आहे. त्यामुळे अनेकांनी हा दावा खरा मानून चिंता व्यक्त केली. मात्र, या दाव्याची सखोल तपासणी केल्यानंतर सरकारकडून यावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. केंद्र सरकारची अधिकृत माहिती संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने या संदेशाला पूर्णपणे फेक ठरवलं आहे. PIB Fact Check ने सांगितलं आहे की, केंद्र सरकारने पेन्शनधारकांचा महागाई भत्ता किंवा वेतन आयोगाचे कोणतेही लाभ बंद केलेले नाहीत.

PIB च्या स्पष्टीकरणानुसार, CCS (पेन्शन) नियम 2021 मधील नियम क्रमांक 37 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र हा बदल सर्वसाधारण पेन्शनधारकांवर लागू होत नाही. हा नियम फक्त एका विशिष्ट परिस्थितीसाठी आहे. जर एखादा सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात म्हणजेच PSU मध्ये समाविष्ट झाल्यानंतर गंभीर गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा शिस्तभंगाच्या कारणामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आला, तर अशा कर्मचाऱ्याचे निवृत्ती लाभ जप्त केले जाऊ शकतात.

8th pay commission salary hike update
Pradnya Satav news : मोठी बातमी : काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार? अधिवेशनादरम्यान काय घडलं?

याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, केवळ सरकारी विभागातून PSU मध्ये गेलेल्या आणि नंतर दुराचारामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांनाच पेन्शन किंवा इतर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळणार नाहीत. याचा सर्वसाधारण सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता, पेन्शन किंवा आठव्या वेतन आयोगाच्या लाभांशी काहीही संबंध नाही.

सरकारने स्पष्ट केल्यामुळे हे निश्चित झाले आहे की, आठव्या वेतन आयोगाचा लाभ पात्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. कोणाचाही सरसकट पत्ता कट होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रामाणिक संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com