AAP Leader Sanjay Singh News : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवत, राज्यात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष ठरलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आता आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा केंद्राने आता बहाल करायला हवा, अशी मागणीही केली आहे.
दिल्लीतील सत्ताधारी आम आमदी पार्टीचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरही हरियाणामधील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आघाडी होवू दिली नाही. जर १७-१७ बंडखोर उमेदवार उभा राहून काँग्रेसला पराभूत करणार असतील, तर ते कसे जिंकतील?. अशा १७ जागांवर काँग्रेस पराभूत झाली जिथं बंडखोर उमेदवार उभा राहिले होते. काँग्रेसने याचा आढावा घेतला पाहीजे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेवरून महाराष्ट्र सरकार आणि विशेषकरून भाजपवर संजय सिंह यांनी निशाणा साधला. 'एक असे गुन्हेगारी कृत्य ज्यामुळे संपूर्ण देश धक्क्यात आणि हैराण आहे. जिथेही भाजपचे सरकार आहे तिथे गुन्हेगारी वाढलेली आहे. हत्या, लूट, अपहरण, गँगरेप आणि व्यापाऱ्यांकडून वसुलीच्या घटना घडत आहेत आणि भाजपचे केंद्र व राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी ठरत आहेत.'
याशिवाय जम्मू-काश्मीरच्या मुद्य्यावर संजय सिंह यांनी म्हटले की, खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या( Jammu and Kashmir) रॅलींमध्ये सांगितले की, आम्ही यास पूर्ण राज्य बनवू. आता निवडणूक संपली आहे. इंडिया आघाडीच्या बाजूने जनादेश आला आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वात सरकार बनत आहे. उमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी, केंद्र सरकारने पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करायला हवा.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.