Naib Singh Saini News : मोठी बातमी! हरियाणात नायबसिंह सैनी यांना जीवे मारण्याची धमकी

Naib Singh Saini received death threats : 'जो कोणी हरियाणाच मुख्यमंत्री बनेल, त्याला...' असं म्हणत आरोपीने दिली धमकी; गोडसे अन् गांधींचाही केला आहे उल्लेख!
Naib Singh Saini
Naib Singh SainiSarkarnama
Published on
Updated on

Haryana BJP CM Naib Singh Saini : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने तिसऱ्यांदा यश मिळवत, एक इतिहास घडवला आहे. यानंतर आता नायबसिंह सैनी हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. परंतु तत्पुर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी नायबसिंह सैनी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे पोलिस आणि प्रशासकीय व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे.

मात्र तत्काळ कारवाई करत ही धमकी देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय त्याच्याविरोधात गुन्हाही नोंदवला गेला आहे. पोलिस चौकशीत या आरोपीची ओळख जींद जिल्ह्यातील देवरड गावाचा रहिवासी अजमेर अशी समोर आली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने हरियाणात नायबसिंह सैनी(Naib Singh Saini) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केले होते. पक्षाने त्यांच्याच नेतृत्वात निवडूक लढवली आणि सलग तिसऱ्यांदा हरियाणात सत्ता राखली. एकूण ९० सदस्य असणाऱ्या विधनसभेत भाजपने बहुमताच्या आकड्यापेक्षा दोन जागा अधिक म्हणजेच 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 37 जागांवरच विजय मिळवता आला. याशिवाय दोन जागांवर इंडियन नॅशनल लोकदल आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळला आहे.

Naib Singh Saini
Muralidhar Mohol - Video : ..अन् मोहोळांनी रस्त्यात अचानक वाहनताफा थांबवत 'त्या' वाहतूक पोलिसाची घेतली गळाभेट!

प्राप्त माहितीनुसार, नायबसिंह सैनी यांना एका व्हाट्स अ‍ॅप ग्रुप मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली गेली. हा व्हाट्स अ‍ॅप ग्रुप 'सोमबीर राठी जुलाना हलके'च्या नावाने आहे. या ग्रुपमध्ये काही दिवसांआधी आरोपीने लिहिले होते की, जो कोणी हरियाणाचा मुख्यमंत्री बनेल, मी त्याला गोळी मारेल, ज्याप्रकारे महात्मा गांधींना गोडेसेने मारली होती.

सोमबीर राठी पहलवान आणि जुलाना हलके येथून काँग्रेसच्या(Congress) तिकीटावर ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या पतीने निवडणूक जिंकली आहे. आता पोलिसी या प्रकरणी आरोपी अजमेरची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या प्रकारणाची माहिती मिळताच संबंधित आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Naib Singh Saini
Kapil Patil on Kisan Kathore : 'हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा, मग..' ; कपिल पाटलांचं किसन कथोरेंना आव्हान?

लाडवा मतदारसंघातून सैनी विजयी झाले आहेत -

नायबसिंह सैनी यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा विधानसभा मतदारसंघातून जिंकली आहे. त्यांना याचवर्षी मार्च महिन्यात हरियाणाचे मुख्यमंत्री बनवलं गेलं होतं. यानंतर निवडणूक काळात सैनी यांनी झपाट्याने निवडणूक सभा घेतल्या. भाजपच्या(BJP) विजयात सैनी यांच्या लोकप्रियतेचाही मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. सैनी हे ओबीसी समुदायातून येतात आणि हा समाज हरियाणात मोठ्यासंख्येने आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com