दिल्लीतील यशानंतर मुंबई महापालिकेत नशीब आजमवण्यासाठी 'आप' सज्ज

मुंबईत आप'ने आपले पाय रोवायला सुरुवात केल्यास त्याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे.
Aam Adami Party
Aam Adami Party Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मिळालेल्या घवघवीत यशानंतर आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) आता आपले लक्ष महाराष्ट्राकडे वळवले आहे. दुसऱ्यांदा मिळालेल्या यशानंतर आप'ने आता देशभरात आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पक्षाने मुंबईतील गुजराती मतदारांना (Gujarati voters) आकर्षित करण्यासाठी आपकडून गुजराती विंगची (Gujrati Wing) स्थापना केली आहे.

Aam Adami Party
अमेरिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर नरेंद्र मोदींनी केले 'हे' पहिले काम

दिल्लीतील मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा मतं "आप'ला मिळाली होती. आता मुंबईतही गुजराती मतदरांसह मुस्लिम मतदारांनाआकर्षित करण्यासाठी आप'कडून प्रयत्न केले जाणार आहेत. सुरतमध्ये आप पक्षाचे २७ नगरसेवक निवडणून आले, मुंबईतल्या या गुजराती विंगच्या उद्दघाटनासाठी सुरतमधील आपचे नगरसेवक सहभागी झाले होते.

मात्र दुसरीकडे, मुंबईत आप'ने आपले पाय रोवायला सुरुवात केल्यास त्याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण मोठ्या प्रमाणावर गुजराती मतदार भाजपला कायम मतदान करणारा आहे, तर मुस्लिम समाजाची मतं काँग्रेसला अधिक मिळत असतात. हे मतदार आपकडे वळल्यास त्याचा या दोन पक्षांना मत विभाजन होऊन फटका बसू शकतो. अशी शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com