केजरीवालांची मोठी घोषणा; 'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अखेर ठरला

मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा ठऱवण्यासाठी मोबाईवर मेसेज पाठवण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले होते.
Punjab Election 2022
Punjab Election 2022 Sarkarnama
Published on
Updated on

मोहाली : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Election 2022) आम आदमी पक्षाने (AAP) जोर लावला आहे. पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अनेकदा पंजाबचा दौरा करत रंगत वाढवली आहे. त्यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा ठऱवण्यासाठी मोबाईवर मेसेज पाठवण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले होते. त्याची घोषणा केजरीवाल यांनी मंगळवारी केली.

आपचे दोनवेळा खासदार राहिलेले नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांना नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. केजरीवाल यांनी मान यांच्या नावाची घोषणा करत राजकीय चर्चेवर पडदा टाकला आहे. मान यांना फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 93 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली. यामध्ये 21 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती केजरीवाल यांनी यावेळी दिली. (AAP Picks MP Bhagwant Mann For Punjab as a CM Face)

Punjab Election 2022
मोदी सरकारच्या भूमिकेविरोधात भाजपच्याच राज्याने काढला आदेश

केजरीवाल म्हणाले, 'पंजाबमध्ये (Punjab) आपचाच विजय होणार असल्याचे स्पष्ट आहे. लोकांना ज्या पध्दतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडला आहे, त्यानुसार तेच पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील.' मान यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. ते म्हणाले, 'काही लोक माझा चेहरा बघून हसायचे. आता ते रडून म्हणतात, आम्हाला वाचवा.' पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करणारा आप हा पहिला पक्ष ठरला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने याची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार आप या राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सर्वेक्षणानुसार, राज्यातील 6 टक्के जनतेने अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे. सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के, अरविंद केजरीवाल यांना 17 टक्के आणि चरणजीत सिंह चन्नी 29 टक्के, नवज्योत सिंह सिद्धू 6 टक्के तर भगवंत मान यांना 23 टक्के व इतरांना 4 टक्के मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com