AAP Vs Congress : माजी उपमुख्यमंत्र्यांची कमाल ! मिळकत साडेचार कोटी तर खर्च केले...; काँग्रेसच्या नेत्याला अटक

Omprakash Soni Arrest For Intangible Assets : ओपी सोनी यांच्यावर पत्नी आणि मुलाच्या नावावर मालमत्त, काँग्रेसने मुख्यमंत्री मान यांच्यावर टीका
OP Soni
OP SoniSarkarnama
Published on
Updated on

Congress Leader In Panjab : देशभरात केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांतील नेत्यांवर विविध कारणांनी कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधकांतील आम आदमी पक्षाच्या पंजाबमधील सरकारने काँग्रेसच्या बड्या नेत्यांना अटक केली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रस नेते, माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी यांना अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या दक्षता विभागाने रविवारी (ता. ९) चंदीगढ येथे ही कारवाई केली. (Latest Political News)

गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ओमप्रकाश सोनी यांना गतवर्षी २५ नोव्हेंबर रोजी दक्षता विभागाने पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. दक्षता विभागाने २०१६ ते २०२२ दरम्यान सोनींच्या विरोधात केलेल्या तपासात बेहिशोबी मालमत्तेचा दावा केला आहे. त्यानंतर सोनी यांना रविवारी (ता. ९ जुलै) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चंदीगढ येथे करण्यात आली. त्यानंतर सोनी यांना अमृतसरला नेण्यात आले. त्यांना आज सोमवारी (ता. १० जुलै) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. (AAP News)

OP Soni
Ganpat Gaikwad Fake Facebook Account : भाजप आमदार महिलांना पाठवायचा मेसेज ? ; फेक अकाऊंट उघडकीस, एकाला अटक

दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी आणि त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न साडेचार कोटी रुपये होते. तर त्यांनी साडेबारा कोटी रुपये खर्च केल्याचे तपासात आढळून आले. सोनी यांनी पत्नी आणि मुलाच्या नावे मालमत्ता निर्माण केल्याचा दावा विभागाने केला आहे. सोनी यांच्या अटकेनंतर काँग्रसने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील समस्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा आणखी एक प्रयत्न आहे. सूडाचे राजकारण करून काहीही निष्पन्न होत नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

कोण आहेत ओपी सोनी?

ओमप्रकाश सोनी हे पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सोनी १९९७ पासून २०२२ पर्यंत सलग पाचवेळा आमदार झाले आहेत. २०२२ मध्ये सोनी अमृतसर सेंट्रल मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. २०२१ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळी ओमप्रकाश सोनी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.

OP Soni
Rohit Pawar facebook Post : अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट; म्हणाले,'' काही आपल्याच जवळची माणसं...''

काँग्रेस-आपमधील तेढ वाढणार?

पंजाबमधील दक्षता ब्युरोने पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी करत आहे. दक्षता ब्युरोने या आठवड्यात चन्नी यांची चौकशी केली. मोहालीत या चौकशीपूर्वी दक्षता पथकाने एप्रिल आणि जूनमध्ये दोनदा चन्नी यांची चौकशी केली होती. यानंतर रविवारी ओमप्रकाश सोनी यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेस आणि आपमधील तेढ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com