BJP : भाजप मंत्र्याच्या घरावर झळकले 'मोदी हटाओ देश बचाओ' चे बॅनर ; काय आहे प्रकरण ?

Jyotiraditya Scindia Palace APP News : 'जयविलास पॅलेस'च्या दरवाज्यावर फलक चिकटवले.
 Jyotiraditya Scindia  Palace
Jyotiraditya Scindia PalaceSarkarnama
Published on
Updated on

APP workers put up posters gate Jyotiraditya Scindia Palace : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. आम आदमी पक्षाने 'मोदी हटाओ देश बचाओ'अभियान सुरु केले आहे.

'मोदी हटाओ देश बचाओ' असा मजकूर असलेले पोस्टर ११ भाषांमध्ये प्रदर्शित केले आहेत. काल (गुरुवारी) ग्वालियर येथे आम आदमी पक्षाच्या (APP) कार्यकर्त्यांनी फूलबाग चौक येथे मोदींच्या विरोधात आंदोलन केले. मोदी यांना हटविण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांच्या हातात यावेळी 'मोदी हटाओ देश बचाओ'असा मजकूर असलेले फलक होते. आंदोलन दरम्यान काही कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा शाहीमहाल 'जयविलास पॅलेस'च्या दरवाज्यावर 'मोदी हटाओ देश बचाओ'चे फलक चिकटवले.

'जयविलास पॅलेस'मध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी त्यांना गेटवरच अडवले. यावेळी आपच्या प्रदेश उपाध्यक्ष रुचि गुप्ता आणि आपच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा मनिषा सिंह तोमर आदी उपस्थित होते.

 Jyotiraditya Scindia  Palace
Kapil Sibal Furious On Digvijay Singh: जर्मनीचे आभार मानणाऱ्या दिग्विजय सिंहांवर का भडकले कपिल सिब्बल..

आपच्या प्रदेशाध्यक्षांना आपल्या राज्यात हे पोस्टर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'मोदी हटाओ देश बचाओ'हे पोस्टर मराठीसह , हिंदी, उर्दू, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तेलगु, बंगाली, कन्नड आदी ११ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे.'आप'ने ११ भाषांमध्ये प्रदर्शित केलेले पोस्टर काही दिवसापूर्वी राजधानी दिल्ली येथे लावण्यात आले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्षामध्ये पोस्टरवॉर रंगले होते.

 Jyotiraditya Scindia  Palace
Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

याप्रकरणी 'आप'च्या सहा जणांना अटक केली होती.'आप'च्या पोस्टरला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने 'केजरीवाल हटाओ, दिल्ली बजाओ'अशा आशयाचे पोस्टर दिल्लीत विविध ठिकाणी लावण्यात आले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी पक्षाने पाच नवे पाच राष्ट्रीय संयुक्त सचिवांची नियुक्ती केली आहे. सुधीर वधानी, उमेश मकवाना, हेमंत खावा, भूपत भयानी, पंकज सिंह यांचा यात सहभाग आहे. सुधीर वधानी, उमेश मकवाना, हेमंत खावा आणि भूपत भयानी हे गुजरातमध्ये 'आप'चे आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com