Abhishek Banerjee BJP rumors : ममतांसोबत मतभेद अन् भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अभिषेक बॅनर्जींनी अखेर सोडलं मौन!

TMC Abhishek Banerjee : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत? ; पक्षांतर्गत संघर्षाबाबतही अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे टिप्पणी
Abhishek Banerjee
Abhishek Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Abhishek Banerjee Mamata rift : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या मतभेदांबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवाय ममता बॅनर्जींशी व पक्षाशी आपण एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात  त्यांनी सांगितले की, मी तृणमूल काँग्रेसचा एक निष्ठावान शिपाई आहे आणि माझ्या नेत्या ममता बॅनर्जी आहेत.

भाजपमध्ये(BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावत अभिषेक बॅनर्जींनी सांगितले की, जे लोक म्हणत आहेत की मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ते खोट्या अफवा पसरवत आहेत. जर माझे डोके जरी उडवले तरी मी ममता बॅनर्जी जिंदाबाद म्हणत राहील. या दिवसात ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी जाणतो की पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीआधी आपल्या स्वार्थापायी काहीजण अशाप्रकारे खोट्या बातम्या पसरवत आहेत.

Abhishek Banerjee
Mamata Banerjee News : महाराष्ट्र निवडणुकीतील ‘त्या’ कथित घोळाची कुणाकुणाला भीती? ममतादीदी झाल्या सावध...

पक्षातील सदस्यांनी अंतर्गत संघर्ष करण्याऐवजी जनसेवेवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा आग्रह करत अभिषेक बॅनर्जी(Abhishek Banerjee) यांनी म्हटले की, आपल्या मतभेदांना विसरून लोकांसाठी काम करण्यावर लक्ष्य केंद्रीत करा. कट-कारस्थानात सहभागी होण्यात काही अर्थ नाही. व्हॉट्स अप ग्रुपच्या राजकारणात लिप्त असणाऱ्या लोकांना माहिती असायला हवं की अशाप्रकारचे प्रयत्न व्यर्थ ठरतील. कट रचणाऱ्यांवरच याचा परिणाम होईल. तसेच त्यांनी हेही सांगितले की ते पक्षातील गद्दारांना उघडे करत राहतील. जसे की मागील निवडणुकीच्यावेळी केले होते.

याशिवाय अभिषेक बॅनर्जींनी म्हटले की, या आधी मी मुकुल रॉय आणि शुभेंदु अधिकारी(Suvendu Adhikari) यांच्यासारख्या पक्षाला धोका देणाऱ्यांना ओळखलं होतं. मी त्यांना उघडं पाडण्याची जबाबदारी घेतली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये मी अशा लोकांना शोधून काढत राहीन.

Abhishek Banerjee
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी मागितली जनतेची माफी; महाकुंभ संपताच बरंच काही बोलले...

याशिवाय त्यांनी पक्षातील बेशिस्तपणाबाबतही इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, अनेक नेते पक्षाच्या शिस्तीचे पालन न करता मीडियामध्ये प्रासंगिक राहण्यासाठी प्रतिक्रिया देत आहेत. पक्षाचे नियम मोडू नका. असं करण्याची ओळख आधीच पटलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com