अभिनेते प्रकाश राज यांचा पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल; 'ते' 20 फोटो टिवि्ट करत म्हणाले...

Actor Prakash Raj News : अभिनेते प्रकाश राज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही...
Actor Prakash Raj Latest News  
PM Narendra Modi
Actor Prakash Raj Latest News PM Narendra Modi Sarkarnama

Actor Prakashraj News : अभिनेते प्रकाश राज हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींचे वेगवेगळ्या वेशभूषेतील विविध फोटो टिवि्ट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.त्यांच्या टीकेमुळे आता पुन्हा एकदा प्रकाश राज (Prakash Raj) विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे वेगवेगळ्या पेहरावातील 20 फोटो अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट केले आहेत. यापैकी अनेक फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या टोप्या, पगड्या परिधान केल्या आहेत. याच फोटोंचा संदर्भ देत प्रकाश राज यांनी ओव्हर ड्रेसिंग… इज दी न्यू न्यूडीटी अशी कॅप्शन देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या पेहरावातील 20 फोटो अभिनेते प्रकाशराज यांनी ट्विट केले आहेत. यापैकी अनेक फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या टोप्या, पगड्या परिधान केल्या आहेत. याच फोटोंचा संदर्भ देत प्रकाशराज यांनी ओव्हर ड्रेसिंग… इज दी न्यू न्यूडीटी अशी कॅप्शन देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Actor Prakash Raj Latest News  
PM Narendra Modi
Gujarat Election : गुजरात एक्झिट पोल 'आप'साठी चांगले संकेत? भाजपचं वाढू शकतं टेन्शन!

अभिनेते प्रकाशराज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील वाढती महागाई, हिंसाचार,जातीय राजकारण. भ्रष्टाचार यांच्यासह विविध मुद्द्यांवर मोदी सरकारसह भाजपवर टीकेची झोड उठवल्याचे वारंवार पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा प्रकाशराज यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टिवि्टद्वारे हल्लाबोल केला आहे. यानंतर भाजप व मोदी समर्थकांकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत असून ट्रोल देखील केले जात आहे.

Actor Prakash Raj Latest News  
PM Narendra Modi
Chitra Wagh; गर्दी नसल्याने चित्रा वाघ पदाधिकाऱ्यांवर संतापल्या!

काही दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत मोदी हे काँग्रेस सरकारच्या काळातील युरियाचा प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप करताना दिसत होते. तसेच त्यांच्याकडून भाजपा सरकारनं भ्रष्टाचारावर नियंत्रण आणल्याचं देखील सांगितलं होतं. यावर प्रकाश राज यांनी सगळीकडे भ्रष्टाचार 40 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के अशी कॅप्शन देत मोदींना लक्ष्य केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com